आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युगांडामध्ये चेंगराचेंगरी, 9 जणांचा मृत्यू:नववर्षाच्या पार्टीत गोंधळ; मृतात 10 वर्षीय मुलगा, लोक पाहत होते फटाक्यांची आतिषबाजी

5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

युगांडामध्ये नवीन वर्षाच्या उत्सव सोहळ्यात गोंधळ उडाल्याने चेंगराचेंगरी झाली. यात 9 जणांचा मृत्यू झाला. पोलिसांनी सागितले की, ही घटना कंपाला येथील फ्रीडम सिटी मॉलमध्ये मध्यरात्री 12 च्या सुमारास घडली. फटाक्यांची आतिषबाजी पाहण्यासाठी लोकांना मॉलच्या बाहेर बोलावण्यात आलेले होते. असे प्राथमिक माहिती देण्यात आलेली आहे.

फटाक्यांची आतिषबाजी सुरू असताना अचानक गोंधळ उडाला काही कळण्याआधीच धावाधाव सुरू झाली. या चेंगराचेंगरीत 5 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाले. तर रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या अन्य 4 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये अनेक चिमुकल्यांचा समावेश आहे. यातील एका मुलाचे वय 10 वर्ष असल्याचे सांगण्यात येत आहे.

चेंगराचेंगरीमुळे 10 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये अनेक लहान मुलांचाही समावेश आहे.
चेंगराचेंगरीमुळे 10 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये अनेक लहान मुलांचाही समावेश आहे.

श्वसनात त्रास झाल्याने अनेकांचा मृत्यू
अपघातानंतर पोलिसांनी सांगितले की, नवीन वर्षाचे फटाके पाहण्यासाठी अनेक जण एकत्र धावू लागले. त्यामुळे मॉलच्या छोटय़ाशा हॉलमध्ये लोकांची गर्दी झाली होती. परिस्थिती इतकी बिकट झाली की, या गर्दीत अनेक लोक दबले गेले. त्यांचा गुदमरून मृत्यूमुखी पडले. एवढ्या लोकांना एकत्रित करण्यामागे कोण जबाबदार आहे, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.