आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2035 पासून अंतराळात सौर ऊर्जेचे उत्पादन:उपग्रह सौर ऊर्जा गोळा करून पृथ्वीवर पाठवणार, यातून वीज बनणार

लंडनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अवकाशातून सौरऊर्जा एकत्र करुन मायक्रोवेव्हद्वारे पृथ्वीवर वीज पुरवठ्याचा भन्नाट प्रयोग भविष्यात प्रत्यक्षात येऊ शकतो. ब्रिटनच्या स्पेस एनर्जी इनिशिएटिव्हचे (SEI) सह-अध्यक्ष मार्शियन सोल्ताऊ यांच्या मते, 2035 पर्यंत हे प्रत्यक्षात येऊ शकते. सध्या त्यांची टीम 'कॅसिओपेआ' या प्रकल्पावर काम करत आहे, ज्यामध्ये मोठे उपग्रह पृथ्वीच्या उच्च कक्षेत पाठवले जातील.

उपग्रह सौरऊर्जेची निर्मिती करतील

बीबीसीच्या रिपोर्टनुसार, उच्च कक्षेत पाठवलेले उपग्रह सौरऊर्जा निर्माण करून पृथ्वीच्या दिशेने पाठवतील. या प्रकल्पाची क्षमता अमर्याद असल्याचे सोल्ताऊ म्हणतात. सैद्धांतिकदृष्ट्या, यामुळे 2050 पर्यंत संपूर्ण जगाला ऊर्जा पुरवता येईल.

वास्तविक, अंतराळात सौर ऊर्जेचा पुरवठा खूप जास्त आहे आणि पृथ्वीच्या उच्च कक्षेत मोठ्या उपग्रहांसाठीही भरपूर जागा आहे. पृथ्वीच्या भूस्थिर कक्षेभोवतीच्या एक छोट्या पट्टीला दरवर्षी 100 पट अधिक सौर ऊर्जा मिळते. इतकी ऊर्जा 2050 मध्ये पृथ्वीवरील मानव वापरतील असा अंदाज आहे.

उपग्रह कसे काम करतील?

मिळालेल्या माहितीनुसार, कारखान्यात बनवलेल्या लाखो छोट्या मॉडेल्सचे मिश्रण करून हे उपग्रह बनवले जाणार आहेत. रोबोटच्या मदतीने ते अंतराळात जोडले जातील. हे रोबोट्स त्यांची देखभाल आणि सर्व्हिसिंगही करतील.

उपग्रह सौर ऊर्जेचे हा-फ्रिक्वेंसी रेडिओ लहरींमध्ये रूपांतर करतील आणि अँटेनाद्वारे त्या पृथ्वीवर पाठवतील. त्यानंतर या रेडिओ लहरींचे वीजेत रूपांतर केले जाईल. प्रत्येक उपग्रह 2 गिगावॅट वीज निर्मिती करण्यास सक्षम असेल. सूर्यप्रकाश पृथ्वीवर विखुरलेल्या स्वरुपात येतो, परंतु अंतराळात असे काहीही घडत नाही.

अमेरिकेतही तयार होत आहे असा प्रकल्प

अमेरिकेची वायुसेना संशोधन प्रयोगशाळा (AFRL) देखील अशाच तंत्रज्ञानावर काम करत आहे. स्पेस सोलर पॉवर इन्क्रिमेंटल डेमोन्स्ट्रेशन अँड रिसर्च (SSPIDR) असे या प्रकल्पाचे नाव आहे. यामध्ये सौर सेल्स सुधारणे आणि वीज निर्मितीसाठी सौर ऊर्जेचे रेडिओ लहरींमध्ये रूपांतर करणे समाविष्ट आहे.

बातम्या आणखी आहेत...