आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेगवान वाऱ्यात विमानाचे थरारक लँडिंग VIDEO:ब्रिटनमधील घटना, वैमानिकाच्या कौशल्याचे सर्वांकडून कौतुक

ब्रिस्टल23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रिटनमध्ये बुधवारी खराब हवामान आणि खूपच धोकादायक परिस्थितीतही एक विमान सुखरुपपणे लँड करण्यात आले. विमान धावपट्टीवर उतरवतानाचा थरारक व्हिडिओ आता समोर आला आहे. यात ऑरिग्ने ATR72-600 विमान हवेतच डगमगताना दिसते. पायलटने आपले कौशल्य पणाला लावत विमान तिरपे करून ते अगदी सुरक्षितरित्या ब्रिस्टल विमानतळावर उतरवले.

ब्रिस्टल विमानतळावर विमानत उतरवत असताना पाऊस आणि जोरदार वाऱ्यांमुळे ते हवेतच डगमगू लागले. लँडिगदरम्यान पायलटला अडचणींचा सामना करावा लागला. रनवेवर उतरल्यानंतरही विमान स्थिर होऊ शकले नाही. पण पायलटने कौशल्याने काही सेकंदांनंतर विमान यशस्वीपणे लँड केले.

क्रॉसविंड लँडिंगसाठी विमान तिरपे करावे लागते. हे खूप धोकादायक असते.
क्रॉसविंड लँडिंगसाठी विमान तिरपे करावे लागते. हे खूप धोकादायक असते.

वादळी पावसाचा यलो अलर्ट होता

ब्रिटनमध्ये वादळी पावसामुळे विमानतळावरील हवामान अतिशय खराब होते. परिस्थिती विमानाच्या लँडिंगसाठी अनुरूप नव्हती. तेव्हा हवेचा वेग ताशी 44 किमी इतका होता. हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केलेला होता.

काय असते क्रॉसविंड

विमानाच्या उड्डाणाच्या दिशेच्या काटकोनात वाहणाऱ्या वेगवान वाऱ्यांना क्रॉसविंड म्हणतात. या वाऱ्यामुळे विमान लँडिंगदरम्यान रनवेवरून भटकू शकते. यामुळे मोठी दुर्घटना होण्याचा धोका असतो. सामान्यपणे अशा स्थितीत विमान लँड केले जात नाही. फक्त आणीबाणीत किंवा इंधन कमी असल्यावरच अशा स्थितीत लँडिंग केले जाते.

लंडनमध्येही घडली आहे घटना

यावर्षी फेब्रुवारीत लंडनमधूनही असाच एक व्हिडिओ समोर आला होता. यात विमानाने दोन वेळा धावपट्टीला स्पर्श केला आणि नंतर ते हवेत उडायला लागले. यादरम्यान विमान उलटण्याची स्थिती निर्माण झाली होती. मात्र वैमानिकाने विमान पुन्हा हवेत नेण्याचा निर्णय घेतला. यामुळे लोकांचे प्राण वाचले.

बातम्या आणखी आहेत...