आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
युराेपीय संघासाेबत आता नाे ब्रेक्झिट डील करण्याची वेळ येऊन ठेपली आहे, असे ब्रिटनचे पंतप्रधान बाेरिस जाॅन्सन यांनी अलीकडेच म्हटले हाेते. म्हणजेच ईयूसाेबत काेणत्याही स्वरूपाचा करार केला जाणार नाही. अशा करारातून ब्रिटन बाहेर पडेल, असे त्यांनी स्पष्ट केले हाेते. जाॅन्सन यांनी करार व्हावा यासाठी अनेकदा प्रयत्न केले, परंतु आपल्या मागणीला ईयूच्या नेत्यांकडून दाद मिळत नसल्याने पंतप्रधानांवर निराशा आली आहे. परंतु त्यासाठी जाॅन्सन हे जबाबदार मानले जातात. कारण जाॅन्सन तीन दशकांपूर्वी पत्रकार म्हणून कार्यरत हाेते. तेव्हा ईयूच्या विराेधात दिलेल्या बातम्यांची यात महत्त्वाची भूमिका मानली जाते.जाॅन्सन १९९० च्या दशकात ब्रिटिश वृत्तपत्र डेली टेलिग्राफचे परदेशातील प्रतिनिधी म्हणून कार्यरत हाेते. तेव्हा त्यांनी युराेपीय संघ व त्यांच्या अधिकाऱ्यांच्या िवराेधात अनेक बातम्या प्रकाशित केल्या हाेत्या. त्यापैकी काही बातम्या पुढे खाेट्या असल्याचेही सिद्ध झाले हाेते.
ईयूचे तेव्हाचे काही अधिकारी अजूनही प्रभावशाली स्थितीत आहेत. हे अधिकारी जाॅन्सन यांचे एेकून घ्यायला तयार नाहीत. युराेपीय संघ अखेर झुकताे, असे जाॅन्सन यांनी पत्रकार असताना अनेक वेळा लिहिले हाेते. आता जाॅन्सन यांच्यावरच ईयूचे मन वळवण्याची वेळ आली आहे. जाॅन्सन यांनी ईयूचे अध्यक्ष उर्सुला वाॅन डेर लेयिन यांचे मन वळवण्याचे प्रयत्न केले. परंतु त्यांना त्यात यश मिळाले नाही. ९० च्या दशकात जाॅन्सन यांच्या पत्रकारितेमधील सहकारी साेनिया पर्नेल यांनी काही आठवणी सांगितल्या. तुम्ही जसे काम करता तसेच लाेक तुमच्याशी वर्तन करतात, असे पर्नेल यांना वाटते.
पण पुढे अनेक बातम्या खाेट्या ठरल्या
युराेपीय रिफाॅर्मचे संचालक चार्ल्स ग्रँट म्हणाले, जाॅन्सन यांनी अनेक वेळा ईयूच्या अधिकाऱ्यांना लक्ष्य केले. पुढे चालून त्यापैकी अनेक बातम्या खाेट्या असल्याचेही सिद्ध झाले हाेते. ईयूची इमारत स्फाेटाने उडवून दिली जाणार आहे. त्या जागी नवीन भवन साकारले जाईल, असे त्यांनी एकदा लिहिले हाेते. प्रत्यक्षात तसे घडले नाही. प्रत्यक्षात जुन्याच त्याच इमारतीची डागडुजी करून तिचा वापर करण्यात येत आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.