आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराब्रिटनमध्ये किंग चार्ल्स तृतीय यांचा राज्याभिषेक झाला. चार्ल्स यांनी गेल्या सप्टेंबरमध्ये आई क्वीन एलिझाबेथच्या निधनानंतर राजाची पदवी स्वीकारली होती. शनिवारी राज्याभिषेक करताना कँटरबरीचे आर्चबिशप जस्टिन वेल्बी यांनी त्यांना मुकुट घातला. हा इंग्लंडच्या महाराजाच्या शक्तीचे प्रतीक आहे. अशा पद्धतीने ७४ वर्षीय किंग चार्ल्स ब्रिटनच्या सिंहासनावर विराजमान होणारे सर्वात ज्येष्ठ ब्रिटिश सम्राट झाले. राज्याभिषेकाशी संबंधित विधी ८० मिनिटे चालले.
वेस्टमिन्स्टर अॅबे १०६६ मध्ये “विल्यम द कॉन्करर’नंतर प्रत्येक ब्रिटिश राज्याभिषेकाचे ठिकाण राहिले आहे. किंग चार्ल्स आणि त्यांची पत्नी महाराणी कॅमिला यांनी या भव्य परंपरेचे पालन केले. यादरम्यान हिंदू, शीख, मुस्लिम, बौद्ध आणि ज्यू समुदायातील धार्मिक नेते व प्रतिनिधी अॅबेत उपस्थित होते. १९३७ नंतर कोणत्याही राजाचा हा पहिला राज्याभिषेक आहे. अमेरिकी अध्यक्ष जो बायडेन यांची पत्नी जिल बायडेन यांच्यासह १०० हून अधिक देशांतील सुमारे २००० राष्ट्राध्यक्ष आणि प्रतिनिधी या क्षणाचे साक्षीदार झाले. अमेरिकी राष्ट्राध्यक्षांनी ब्रिटनच्या शाही कुटुंबातील राज्याभिषेकाशी संबंधित कार्यक्रमात सहभागी होण्याची परंपरा अबाधित ठेवली. ७००० जवानांनी संचलनही केले. सुमारे २० लाख लोक लंडनच्या रस्त्यांवर उपस्थित होते.
न्यायासाठी तलवार राजाकडे सोपवली
मुख्य बिशप म्हणाले की त्यांनी चर्चचे संरक्षण आणि न्याय करण्यासाठी तलवार वापरावी. याशिवाय त्यांना सार्वभौम ऑर्बही देण्यात आले होते. त्यावरील क्रॉस हे ख्रिश्चन धर्माचे प्रतीक आहे. प्रिन्स विल्यमने त्याच्यासमोर गुडघे टेकले, त्याच्या हाताचे चुंबन घेतले. पीएम ऋषी सुनक यांनी राज्याभिषेक हा राष्ट्रीय गौरव क्षण असल्याचे सांगितले.
राजसिंहासन ७०० वर्षे जुने, सोहळ्यावर १००० कोटींचा खर्च राज्याभिषेकानंतर चार्ल्स ज्या सिंहासनावर बसले होते ते ७०० वर्षे जुने आहे. विशेष म्हणजे १९५३ मध्ये म्हणजे ७० वर्षांनंतर पहिल्यांदा याचा वापर करण्यात आला. राज्याभिषेक सिंहासन १३०० च्या सुमारास तयार केले आहे. १३०८ मध्ये राजा एडवर्ड द्वितीयच्या राज्याभिषेकापासून आतापर्यंत २६ राज्याभिषेक झाले आहेत. राज्याभिषेकासाठी १० कोटी पौंड (सुमारे १००० कोटी रुपये) खर्च झाले आहेत. यामध्ये शाही खजिन्याचा वापर करण्यात आलेला नाही. अशा स्थितीत ब्रिटनमध्येही अनेकांनी राज्याभिषेक सोहळ्याला विरोध केला. विरोधी आंदोलनामुळे ६ जणांना अटकही करण्यात आली आहे.
कॅमिलाने कोहिनूरजडीत मुकुट घातला नाही
राजा चार्ल्सनी राज्याभिषेकाला ३६० वर्ष जुना आणि राणी कॅमिलाने ३६२वर्षांचा मुकुट घातला होता. राजाच्या मुकुटाला एडवर्ड क्राउन म्हणतात. त्याची किंमत 326 कोटी रुपये आहे. यावेळी राणीने कोहिनूरने जडलेला मुकुट घातला नाही.
बंगालच्या डिझायनरने राजाचे ब्रॉंच बनवले
पश्चिम बंगाली फॅशन डिझायनर प्रियांका मलिकने राजासाठी एक ब्रॉच(कोटवर लावली जाणारी पिन) आणि राणी कॅमिलासाठी ड्रेस तयार केला. त्यासाठी राजघराण्याने प्रियांकाचे आभार मानले आहेत. प्रिन्स विल्यम, पत्नी केट आणि मुले उपस्थित होती.
क्विश हा राज्याभिषेक सोहळ्यातील खास पदार्थ
राजघराण्याचे मुख्य शेफ मार्क फ्लानागन यांनी बनवलेल्या पेस्ट्री किंवा क्विशचा एक विशेष प्रकार अधिकृत राज्याभिषेक पार्टी डिश म्हणून जाहीर करण्यात आली.पालक, बीन्स आणि बडीशेपसारख्या औषधी वनस्पतींचा वापर त्यात केला.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.