आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रिटनमध्ये पालकांना मिळणार मृत मुलांच्या ऑनलाइन वापराचा तपशील:मनाई केल्यास कंपनीस दंडाची शिक्षा

लंडन8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रिटनमध्ये साेशल मीडिया कंपन्यांना आता मृत मुलांविषयीच्या ऑनलाइन वापराचा तपशील त्यांच्या आई-वडिलांना देणे बंधनकारक करण्यात आले आहे. अशी माहिती देण्यास टाळाटाळ केल्यास कंपनीला काेट्यवधी रुपयांचा दंड केला जाऊ शकताे. त्याचबराेबर एक वर्षाची कैदही हाेऊ शकते. ब्रिटनमधील सरकारने ऑनलाइन सुरक्षा कायद्यात बदल करण्याचे ठरवले आहे. मुलाच्या मृत्यूमागे काही साेशल मीडियाची कारणे आहेत का, असा संशय असल्यास पालक त्याबद्दलची सविस्तर माहिती मिळवण्यासाठी कंपनीकडे तशी मागणी करू शकतात. तपास अधिकारीदेखील तशी मागणी करतील. २०१७ मध्ये वैफल्यग्रस्त माैली रसेलने साेशल मीडियावरील आत्महत्येला प्रवृत्त करणाऱ्या पाेस्ट पाहिल्या हाेत्या. त्यानंतर आत्महत्या केली हाेती. तिच्या पालकांनी माैलीच्या साेशल मीडियातील वापराबाबतचा तपशील कंपनीकडे मागितला हाेता. परंतु पाच वर्षांच्या दीर्घ लढाईनंतर माैलीच्या पालकांना ती साेशल मीडियावर नेमके काय करत हाेती, याची तपशीलवार माहिती मिळाली. माैलीने शेवटच्या सहा महिन्यांत चिडचिडेपणा, आत्महत्या, स्वत:ला हानी पाेहोचवणाऱ्या १६ हजारांवर पाेस्ट पाहिल्या हाेत्या. या घटनेनंतर पोटची मुले गमावणाऱ्या पालकांनी साेशल मीडिया कंपनीकडे सविस्तर माहिती मागवली हाेती. माैलीचे वडील इयान रसेल म्हणाले, माहिती मिळाल्यास अशा घटनांची पुनरावृत्ती टाळता येईल.

हानिकारक कंटेंट कसा पाेहाेचला, सांगावे लागेल मृत मुलांच्या अकाउंटबद्दल तसेच त्याचे अल्गाेरिदम व सर्चशी संबंधित माहितीही कंपन्यांना देणे बंधनकारक करण्यात आले आहे. मुलांपर्यंत हानिकारक माहिती पाेहाेचली कशी याबद्दल कंपन्यांना उत्तर द्यावे लागेल.

बातम्या आणखी आहेत...