आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारशियासोबतच्या भयंकर युद्धाचा सामना करणाऱ्या युक्रेनने आपले संरक्षणमंत्री ओलेक्सी रेजनिकोव्ह यांना पदावरून डच्चू देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांची जागा आता युक्रेनच्या मिलिट्री इंटेलिजेन्सचे प्रमुख किर्लो बुदानोव्ह घेतील. राष्ट्राध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की यांच्या पक्षाने रविवारी याची घोषणा केली.
झेलेन्स्की यांच्या सर्व्हेंट ऑफ पीपल पार्टीचे प्रमुख डेव्हीड अर्खामिया यांनी टेलिग्रामच्या माध्यमातून ओलेक्सी यांना पदावरून दूर केल्याची माहिती दिली. ते म्हणाले की, युद्धाच्या काळात युक्रेनचे संरक्षण मंत्रालय एखाद्या नेत्याऐवजी लष्कराचा अनुभव असणाऱ्या व्यक्तीकडे असणे गरजेचे आहे.
ओलेक्सींची दुसऱ्या मंत्रालयात पाठवणी
ओलेक्सी रेजनिकोव्ह युद्धाच्या 3 महिने अगोदर म्हणजे नोव्हेंबर 2021 मध्ये संरक्षण मंत्री झाले होते. झेलेन्स्कींच्या पक्षाचे प्रमुख डेव्हीड अर्खामिया म्हणाले की, ओलेक्सी रेजनिकोव्ह यांना आता दुसरे एखादे मंत्रालय सोपवले जाईल. याविषयी रेजनिकोव्ह यांना छेडले असता त्यांनी आपण दुसरे कोणतेही मंत्रालय स्वीकारणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. तत्पूर्वी, त्यांनी कोणतेही पद कायमस्वरुपी नसल्याची भावना व्यक्त केली होती. तसेच झेलेन्स्कींच्या आदेशांचे पालन करणार असल्याचेही स्पष्ट केले होते.
काय आहे संरक्षण मंत्रालयातील भ्रष्टाचाराचे प्रकरण
24 जानेवारी रोजी युक्रेनचे उप संरक्षण मंत्री याचेस्लाव्ह शापोव्हालोव्ह यांना भ्रष्टाचाराशी संबंधित एका प्रकरणात राजीनामा द्यावा लागला होता. न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार, या स्कँडलमुळेच ओलेक्सी रेजनिकोव्ह यांची हकालपट्टी केली जात आहे. या प्रकरणात ओलेक्सी यांच्यावर भ्रष्टाचाराचे कोणतेही आरोप झाले नाही. पण युद्ध सुरू असताना हे स्कँडल उजेडात आल्यामुळे प्रतिमा जपण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
युक्रेनच्या एका वृत्तपत्राने 21 रोजी आपल्या एका वृत्तात उप संरक्षण मंत्र्यांच्या निर्देशांनुसार, मंत्रालयाने जीवनावश्यक वस्तुंचे कंत्राट तीनपट जास्त दराने मंजूर केल्याचा दावा केला होता. द कीव्ह इंडीपेंडेंटच्या वृत्तानुसार, एक अंडे कीव्हमध्ये 15 रुपयांना मिळते. पण ते 37 रुपयांच्या दराने खरेदी करण्यात आले. अंड्यांसह अन्य काही वस्तुंचीही जादा दराने खरेदी करण्यात आली.
गत आठवड्यात 15 अधिकाऱ्यांचे निलंबन
गत काही महिन्यांत युक्रेनचे अनेक वरिष्ठ अधिकारी व मंत्री भ्रष्टाचाराच्या घोटाळ्यात अडकलेत. यामुळे झेलेन्स्कींच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. या प्रकरणी गत आठवड्यात 15 अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. युक्रेनच्या उप पायाभूत सुविधा मंत्र्यांनाही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
दुसरीकडे, रशिया सातत्याने युक्रेनच्या पायाभूत सुविधांवर हल्ले करत आहे. त्यात तेथील अनेक महत्त्वाच्या इमारती कोसळल्या आहेत. यामुळे युक्रेनला या इमारती पुन्हा उभ्या करण्यासाठी वारेमाप खर्च करावा लागत आहे. इमारतींच्या दुरुस्तीच्या कामासाठी मशिनरी खरेदीच्या कंत्राटात 3 कोटी 23 लाख रुपयांची लाच घेतल्याचा आरोप वासिल लोझिन्स्कीवर होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.