आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युक्रेन - रशिया युध्‍द:युक्रेनचा रशियातील तेल डेपोवर हल्ला, दुसऱ्या महायुद्धानंतर रशियावर हवाई हल्ला केल्याची ही पहिलीच वेळ

मॉस्को4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

युक्रेनने रशियात घुसून त्याच्या तेल डेपोवर हल्ला केला आहे. आमच्या बेलगोरोद शहरात युक्रेनचे दोन हेलिकॉप्टर घुसले आणि त्यांनी एस-८ रॉकेटने हल्ला केला. त्यात डेपोचे दोन कर्मचारी जखमी झाले आहेत, असा आरोप रशियाने केला आहे. रशियाचा दावा खरा असल्यास दुसऱ्या जागतिक महायुद्धानंतर रशियावर हवाई हल्ला केल्याची ही पहिलीच वेळ आहे.

युक्रेनने ज्या तेल डेपोवर हल्ला केला आहे त्याचे संचालन रोजनेफ्ट ही रशियाची सरकारी कंपनी करते. तथापि, रशियाच्या दाव्यावर पाश्चिमात्य देश प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. दुसरीकडे, युक्रेनने रशियाच्या लष्कराच्या ताब्यातून दोन भाग सोडवून घेतल्याचे म्हटले आहे. आम्ही व्यूहात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या स्लोबोडा आणि लुकाशिवका या गावांवर ताबा मिळवला आहे, असे युक्रेनचे म्हणणे आहे.

रशिया-युक्रेनमध्ये भारत करू शकतो मध्यस्थी
रशिया -युक्रेन यांच्यातील शांतता प्रक्रियेत भारत मध्यस्थी करू शकतो, असे रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लाव्हरोव्ह यांनी म्हटले आहे. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांची भेट घेतल्यानंतर ते म्हणाले की, भारत महत्त्वाचा देश आहे. रशिया-युक्रेनमधील वाद सोडवण्यात भूमिका असू शकते असे भारताला वाटले तर तो शांतता प्रक्रियेचा भाग बनू शकतो.

बातम्या आणखी आहेत...