आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Ukraine Bucha Genocide Vs Russian Army । Russian Army Commander Azatbek Omurbekov Attack On Bucha । 400 Dead

बुचा नरसंहाराच्या खलनायकाची कहाणी:रशियन कमांडरने गँगरेप आणि नरसंहाराचे आदेश दिले; सैनिकांना म्हणाला - 50 पेक्षा कमी वयाच्या सर्व पुरुषांना मारून टाका!

कीव्ह/मॉस्को4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अजातबेक ओमुरबेकोव्ह, सेपरेट मोटाराइज्ड रायफल ब्रिगेडचा कमांडर, वय 40 वर्षे... ही ओळख आहे 400 युक्रेनियन लोकांचे स्मशान बनलेल्या बुचा शहराच्या गुन्हेगाराची. रशियन पदकाने सन्मानित आणि देवावर विश्वास ठेवणाऱ्या अजातबेकने सामूहिक बलात्कार आणि नरसंहाराचे आदेश दिले होते. हा कमांडर म्हणाला होता, 50 वर्षांखालील सर्व पुरुषांना मारून टाका.

ब्रिटिश वृत्तपत्र डेली मेलने आपल्या वृत्तात अजात्बेकचे वर्णन बुचा शहराचा कसाई असे केले आहे. आता जग त्याला बुचा शहराचा कसाई या नावानेच ओळखू लागले आहे. निष्पाप लोकांवर गोळ्या झाडल्यानंतर अजात्बेकने मृतदेह दफन करण्यासाठी नातेवाइकांना केवळ 20 मिनिटे दिली, असा दावाही वृत्तात करण्यात आला आहे.

वाचा बुचाच्या गुन्हेगाराची कहाणी...

म्हणाला- युद्धात शस्त्रे महत्त्वाची नाहीत

ऑर्थोडॉक्स चर्चच्या पाद्रीबरोबर ले. कर्नल अजात्बेक ओमुरबेकोव्ह.
ऑर्थोडॉक्स चर्चच्या पाद्रीबरोबर ले. कर्नल अजात्बेक ओमुरबेकोव्ह.

अजात्बेक ओमुरबेकोव्ह याने गेल्या वर्षी ऑर्थोडॉक्स चर्चच्या पाद्रींकडून आशीर्वाद घेतला होता. त्यानंतर तो म्हणाला की- इतिहास सांगतो की आपण बहुतेक युद्ध आपल्या आत्म्याने लढतो. शस्त्रे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट नाही. अलीकडेच, बुचा येथील वेदनादायक आणि भीषण नरसंहाराने संपूर्ण जगाचे लक्ष वेधले आहे.

बळजबरी काढायला लावले कपडे

बुचामध्ये जमिनीवर पडलेले जळालेले मृतदेह पाहताना सैनिक आणि तपास अधिकारी. येथे रशियन सैनिकांवर युद्ध गुन्ह्यांचे आरोप आहेत.
बुचामध्ये जमिनीवर पडलेले जळालेले मृतदेह पाहताना सैनिक आणि तपास अधिकारी. येथे रशियन सैनिकांवर युद्ध गुन्ह्यांचे आरोप आहेत.

बुचा येथील रहिवाशांनी सांगितले- रशियन सैनिकांनी तेथे पोहोचल्यावर कागदपत्रे मागितली. त्यांना जर थोडाही धोका दिसला तर नागरिकांना गोळ्या घातल्या जायच्या. रशियन सैनिकांनी सैन्याच्या टॅटूच्या शोधात अनेक लोकांना कपडे जबरदस्तीने काढायला लावले. मात्र, रशियाने हे आरोप फेटाळून लावले आहेत. सॅटेलाइट फोटोंबाबत रशियाचे म्हणणे आहे की, युक्रेन लोकांच्या हत्येचे नाटक करत आहे.

सैन्य पदकाने सन्मानित आहे कमांडर

19 मार्चच्या या सॅटेलाइट इमेजमध्ये, युक्रेनियन सैनिकांना लाल रंगाने चिन्हांकित ठिकाणी नागरिकांचे मृतदेह आढळले. या काळात बुचा शहर रशियन सैन्याच्या ताब्यात होते.
19 मार्चच्या या सॅटेलाइट इमेजमध्ये, युक्रेनियन सैनिकांना लाल रंगाने चिन्हांकित ठिकाणी नागरिकांचे मृतदेह आढळले. या काळात बुचा शहर रशियन सैन्याच्या ताब्यात होते.

ओमुरबेकोव्हचे वय जवळपास 40 वर्षे आहे. रशियाचे उप संरक्षण मंत्री दिमित्री बुल्गाकोव्ह यांच्या हस्ते 2014 मध्ये त्यांच्या उत्कृष्ट कार्यासाठी त्यांना लष्करी पदकदेखील देण्यात आले. आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार लष्करी कमांडर त्याच्या सैनिकांनी केलेल्या कोणत्याही युद्ध गुन्ह्यासाठी जबाबदार असतो.

बुचा हत्याकांडावरील आजच्या 2 मोठ्या अपडेट्स...

  • भारताने UNSC बैठकीत बुचा हत्याकांडाच्या चौकशीची मागणी केली आहे. संयुक्त राष्ट्रातील भारताचे राजदूत टी.एस. तिरुमूर्ती यांनी येथील नागरिकांच्या मृत्यूच्या बातम्यांचे वर्णन अत्यंत अस्वस्थ करणारे असल्याचे म्हटले. ते म्हणाले- भारत बुचा येथील हत्यांचा निषेध करतो आणि स्वतंत्र तपासाच्या आवाहनाचे समर्थन करतो. मात्र, यावेळी त्यांनी रशियाचे नाव घेतले नाही.
  • भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर म्हणाले की, रक्त सांडून आणि निष्पाप लोकांची हत्या करून कोणतीही समस्या सुटणार नाही. रशिया आणि युक्रेनने संवादातून हा प्रश्न सोडवला पाहिजे. ते म्हणाले- भारताने यात मध्यस्थी केली तर आनंद होईल.
बातम्या आणखी आहेत...