आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारशियाने शनिवारी दावा केला की, युक्रेनने क्रिमियामध्ये ड्रोनने त्यांच्या 10 तेल टँकरवर हल्ला केला. यानंतर खुद्द युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने या हल्ल्याचा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. ज्यावर रशियनांपेक्षा जास्त भारतीयांनी तीव्र आक्षेप घेतला.
याचे कारण म्हणजे मंत्रालयाने ट्विट केलेला फोटो. त्यात युक्रेनच्या हल्ल्यातून निघणाऱ्या धुराच्या ढगावर हिंदू देवी कालीमातेचे चित्र होते. युक्रेनच्या मंत्रालयाने फोटो शेअर केला आणि त्यावर वर्क ऑफ आर्ट लिहिले होते.
फोटो एडिट करून कालीमातेचा केला अवमान
युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने ट्विट केलेल्या फोटोमध्ये कालीमातेला हॉलिवूड अभिनेत्री मर्लिन मनरोसारखा स्कर्ट घातलेला दाखवण्यात आला आहे. जो हल्ल्यातून उठणाऱ्या धुराचा बनला होता. यावर एका युझरने लिहिले की, युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाच्या ट्विटर हँडलने देवी कालीचा अपमान केला आहे हे पाहून मला आश्चर्य वाटत आहे. ते त्वरित हटवावे आणि माफी मागावी, अशी माझी मागणी आहे.
अनेकांनी आक्षेप घेतल्यानंतर हे ट्विट डिलीट करण्यात आले. मात्र, तरीही लोकांनी स्क्रीनशॉट शेअर केले आणि या प्रकरणात परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्या हस्तक्षेपाची मागणी केली.
11 हजार स्क्वेअर फूट परिसरात पसरली आग
युक्रेनच्या हल्ल्यात कोणालाही इजा झालेली नाही. आग 11,000 स्क्वेअर फूट परिसरात पसरल्याचे रशियन अधिकाऱ्यांनी सांगितले होते. जे आता पूर्णपणे नियंत्रणात आले आहे. रशियन टँकरवरील हल्ला हा युक्रेनचा बदला होता. खरं तर, शुक्रवारी रशियाने युक्रेनवर एकामागून एक 26 क्षेपणास्त्रांनी हल्ला केला, ज्यामध्ये 25 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.