आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Ukraine Has So Far Killed 12 Russian Commanders With The Help Of US Real time Intelligence, According To Russian Military Locations.

व्हर्च्युअल मदत:अमेरिकेच्या रिअल टाइम गुप्त मदतीने युक्रेनने आतापर्यंत 12 रशियन कमांडर्सना ठार मारले, रशियन सैन्याचे लोकेशन सांगते

औरंगाबाद13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रशियन हल्ल्याच्या युक्रेनी प्रतिकारामागे अमेरिकेची गुप्त मदत आहे. युक्रेनमधील रशियन सैन्याच्या हालचाली व मोबाइल हेडक्वार्टरबाबत अमेरिका आपले उपग्रह, नाटो देशांची गुप्त उपकरणे आणि इतर मानवी इनपुटच्या आधारे प्राप्त झालेला डेटा युक्रेनी सैन्यांपर्यंत पोहोचवतो. रिअल टाइम माहितीमुळे युक्रेनी सैन्य रशियन सैन्यावर हल्ला करते. युक्रेनच्या अशा हल्ल्यांत आतापर्यंत रशियाचे १२ टॉप कमांड मारले गेले. २४ फेब्रुवारी रोजी सुरू झालेल्या हल्ल्यानंतर आतापर्यंत रशियाचे २२ हजार सैनिक ठार मारल्याचा दावा युक्रेनने केला आहे. रशियाच्या १७६ लढाऊ विमानांचेही नुकसान झाले आहे. रशियाची २१०० पेक्षा जास्त लष्करी वाहनेही उद््ध्वस्त झाली आहेत. कीव्हला कित्येक दिवस वेढा असताना रशियन सैन्य शहरात येऊ शकले नाही. कारण अमेरिकेच्या मदतीने युक्रेनला त्यांचे लोकेशन कळत होते.

मदत सुरूच राहणार : अमेरिकन लष्करप्रमुख

बातम्या आणखी आहेत...