आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेची पोलखोल:युक्रेनकडे हवाई हल्ल्यापासून वाचण्यासाठी मेपर्यंतच स्टॉक

रशिया2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या आठवड्यात ऑनलाइन लीक झालेल्या अमेरिकी संरक्षण विभाग पेंटागॉनच्या गोपनीय दस्तऐवजांनी अमेरिकेची पोलखोल केली आहे. त्यानुसार, मॉस्कोच्या हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी युक्रेनचा दारूगोळा संपत आल्याबद्दल अमेरिका चिंतेत आहे.

लीक झालेल्या १०० दस्तऐवजांत गेल्या फेब्रुवारीच्या अखेरीस रशियाचे हल्ले कसे सुरू झाले आणि सध्या युक्रेनची स्थिती किती भयावह आहे,याचा उल्लेख केला आहे. रशियाची लढाऊ विमाने, बॉम्ब वर्षाव करणाऱ्या विमानांविरुद्ध युक्रेनची ढाल समजल्या जाणाऱ्या सोव्हियत काळातील एस-३०० आणि बक हवाई संरक्षण प्रणाली क्षेपणास्त्रांचा साठा ३ मे आणि मध्य एप्रिलपर्यंत पूर्णपणे संपुष्टात येऊ शकतो. याचा युक्रेनच्या संरक्षण प्रणालीत ८९% वाटा आहे. लीक दस्तऐवजात हेही सांगितले की, रशियाला तोंड देण्यासाठी युक्रेनी हवाई दलाची ताकद २३ मेपर्यंत पूर्णपणे कमी होईल.