आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Ukraine MP Attack Russian Representative | Russia Uukraine War| Russia Ukraine Vladimir Putin | Volodimir Zelensky

फ्री स्टाईल:युक्रेनच्या खासदाराचा रशियन नेत्याला ठोसा, म्हणाला - त्याची हीच लायकी; युक्रेनच्या राष्ट्रध्वजाचा केला होता अवमान, VIDEO

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

युक्रेनच्या खासदाराने रशियाच्या प्रतिनिधीला धक्काबुक्की केली. अंकारा येथे आयोजित ब्लॅक सी इकॉनॉमिक कोऑपरेशनच्या बैठकीत ही घटना घडली. या बैठकीला उपस्थित सदस्यांच्या फोटो सेशनचा सोहळा सुरू होता. युक्रेनचे खासदार अलेक्झांडर मारिकोव्स्की आपल्या देशाचा राष्ट्रध्वज घेऊन उभे होते. त्यावेळी रशियन प्रतिनिधीने अचानक त्यांच्या हातातून ध्वज हिसकावून घेवून फेकून दिला. त्यानंतर ते तसेच पुढे निघून गेले.

त्यांच्या या कृतीमुळे युक्रेनचे खासदार मारिकोव्स्की चांगलेच संतापले. त्यांनी रशियन प्रतिनिधीचा पाठलाग करून त्यांना धक्काबुक्की केली. त्यानंतर दोन्ही नेत्यांत बराच वेळ वाद झाला. या अनपेक्षित घटनेचा व्हिडिओ मॅरिकोव्स्की यांनी शेअर केला आहे. त्यात ते म्हणाले - रशियन प्रतिनिधीची याच ठोशाची लायकी होती.

या फोटोमध्ये युक्रेनचे खासदार अलेक्झांडर मारिकोव्स्की रशियन प्रतिनिधीला धक्काबुक्की करताना दिसत आहेत.
या फोटोमध्ये युक्रेनचे खासदार अलेक्झांडर मारिकोव्स्की रशियन प्रतिनिधीला धक्काबुक्की करताना दिसत आहेत.

24 तासांत 30 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला व्हिडिओ
'द कीव पोस्ट'च्या एका पत्रकारानेही हा व्हिडिओ शेअर केला. त्यानंतर गत 24 तासांत 30 लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला.

पुतिन यांच्या घरावर ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न

राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्या निवासस्थानावर हल्ला करण्यासाठी आलेले ड्रोन रशियन सुरक्षा यंत्रणांनी पाडले.
राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्या निवासस्थानावर हल्ला करण्यासाठी आलेले ड्रोन रशियन सुरक्षा यंत्रणांनी पाडले.

गत 3 मे रोजी रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या घरावर ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न झाला. याचा ठपका युक्रेनवर ठेवण्यात आला. तथापि, युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की यांनी हा आरोप फेटाळला. क्रेमलिनवरील ड्रोन हल्ला युक्रेनने केला नव्हता. असे हल्ले करण्याची क्षमता आमच्याकडे नाही, असे ते म्हणाले होते.

या हल्ल्यानंतर पुतिन यांचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह म्हणाले होते - हल्ला झाला तेव्हा पुतिन क्रेमलिनमध्ये उपस्थित नव्हते. हल्ल्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात आला. सध्या राष्ट्राध्यक्ष त्यांच्या मॉस्को येथील शासकीय निवासस्थानी असून, तेथूनच ते कामकाज करत आहेत.

युक्रेनशी संबंधित खालील बातम्या वाचा...

रशिया-युक्रेन युद्ध:पत्रकाराने रशियाच्या वतीने क्षेपणास्त्र डागले, म्हणाला- युक्रेनला हॅलो...आम्ही नाझींशी लढा देत आहोत

रशिया-युक्रेन युद्धात केवळ सैनिकच नाही तर पत्रकारही संधी मिळाली तेव्हा युक्रेनविरूद्ध त्यांच्या मनातील राग व्यक्त करत आहेत. विशेष बाब म्हणजे नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत दिसून आले की, रशियाच्या एका पत्रकाराने युक्रेनविरूद्ध चक्क क्षेपणास्त्र डागण्याचे काम केले. या रशियन रिपोर्टरचा युद्ध कव्हर करण्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये तो रशियाच्या बाजूने रॉकेट लोड आणि फायर करताना दिसत आहे.

युक्रेनचे माजी सरकारी वकील ग्यूंदुज मामेडोव्ह यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. पत्रकार अशा प्रकारे युद्धात भाग घेत असल्याचे त्यावर त्यानी लिहिले. त्याचबरोबर काही लोक या घटनेकडे रशियाचा प्रोपोगंडा देखील म्हणत आहेत. येथे वाचा संपूर्ण बातमी...

आज चीनसोबत युद्ध केल्यास अमेरिकेचा पराभव:युक्रेनला इतकी क्षेपणास्त्रे दिली की, अमेरिकेचा साठा रिकामा

युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धात कोण बाजी मारणार हे सांगणे कठीण आहे… पण वर्षभराहून अधिक काळ रंगलेल्या या युद्धामुळे आता वाढता तणाव जगाच्या इतर भागातही पाहायला मिळणार हे निश्चित मानले जात आहे.

स्वत:ला जगातील एकमेव महासत्ता मानणाऱ्या अमेरिकेच्या संरक्षण तज्ज्ञांना युक्रेनमध्ये रशियाचे पारडे जड झाल्यास चीन या निमित्ताने तैवानवर हल्ला करू शकतो, असा विश्वास वाटतो.

चीनने असे पाऊल उचलले तर त्याला तैवानच नव्हे तर अमेरिकेशी युद्ध करावे लागेल, असे आश्वासन अमेरिकेने वारंवार दिले आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी...