आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युद्धाचे मैदान:वीजपुरवठा पूर्ववत न झाल्यास कीव्ह रिकामे करण्याची युक्रेनची योजना

मार्क सँटोरा, बेन हबार्ड | कीव, यूक्रेनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

रशियन क्षेपणास्त्रांमुळे नुकसान झालेले पॉवर ग्रीड पुनर्स्थापित करण्यासाठी रात्रंदिवस संघर्ष सुरू आहे. युक्रेनची राजधानी कीव्हमधील अधिकारी म्हणतात की, शहरातील उर्वरित तीस लाख रहिवाशांना पूर्णपणे बाहेर काढण्यासाठी आम्ही ब्लॅकआउटची योजना आखत आहोत. या शक्यतेचा यापूर्वी विचारही केला नव्हता. परिस्थिती आधीच खूप गंभीर आहे. युक्रेनच्या ४० टक्के ऊर्जा पायाभूत सुविधांचे नुकसान झाले आहे किंवा त्या नष्ट झाल्या आहेत. महापालिका कामगार एक हजार हीटिंग शेल्टर तयार करत आहेत. ते बंकर म्हणूनही काम करतील. दुसरीकडे अभियंते आवश्यक उपकरणांशिवाय बॉम्बस्फोटाने उद्ध्वस्त झालेल्या वीज केंद्रांची दुरुस्ती करण्यात व्यग्र आहेत.

युक्रेनच्या राष्ट्रीय ऊर्जा कंपनीने सांगितले की, ग्रीड पूर्णपणे कोसळू नये म्हणून सात प्रदेशांत ब्लॅकआउट सुरू राहील. रशियन सैन्याने देशभरातील महत्त्वाच्या ऊर्जा पायाभूत सुविधांना लक्ष्य केले. विश्लेषकांच्या मते, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युद्धभूमीवर सतत मारा केल्यामुळे त्यांनी ही रणनीती अवलंबली आहे. रशियन हल्ल्यांमुळे युक्रेनमधील नागरिकांसाठी नवीन संकट निर्माण झाले आहे. अधिकारी म्हणतात, अधिक नुकसान झाल्यास मूलभूत सेवा देता येणार नाही.

कीव्ह नागरी प्रशासनाचे सुरक्षा संचालक रोमन ताकचक यांनी एका मुलाखतीत सांगितले की, “रशियाने असेच हल्ले सुरू ठेवले तर आमची संपूर्ण वीज यंत्रणा नष्ट होईल.” आम्ही लोकांना ग्रीड फेल झाल्यानंतर १२ तासांच्या आत शहर सोडण्यास सांगू. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. मोठ्या संख्येने लोक कीव्ह सोडत नाहीत. तथापि, वीज नसल्यास पाणीपुरवठा आणि सांडपाणी व्यवस्था ठप्प होईल. क्षेपणास्त्र आणि बॉम्बपासून वीज केंद्रांचे संरक्षण करण्यासाठी भिंती उभारल्या जात आहेत. दरम्यान, अमेरिकेच्या अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वॉशिंग्टनमध्ये सांगितले की, युक्रेनला अधिक मदत देण्याच्या अमेरिकेच्या घोषणेवरून युक्रेन व त्याच्या शेजारी राष्ट्रांना रशियन धोका अनेक वर्षे टिकेल, असे दिसून येते.

आतापर्यंत 12 वीज केंद्रे लक्ष्य
युक्रेनियन अधिकाऱ्यांनी सांगितले की, गेल्या सोमवारी रशियाने ५० हून अधिक क्रूझ क्षेपणास्त्रे डागली, त्यातील अनेक पाडली गेली. पण, काही क्षेपणास्त्रे वीज केंद्रे, उपकेंद्रांवर आदळली. त्यामुळे हजारो लोकांचा वीजपुरवठा खंडित झाला. शुक्रवारी रशियाने घरांना वीजपुरवठा करणाऱ्या कंपनीच्या केंद्रावर हल्ला केला. महिनाभरात १२ वीजपुरवठा केंद्रांना लक्ष्य करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...