आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Ukraine Russia | Ukraine Ambassador Emotional After Russian Vladimir Putin War Announcement On Ukraine

यूक्रेनी राजदूतांचे UN मध्ये भावुक आवाहन:पुतिन यांच्या युद्धाच्या घोषणेने युक्रेनला धक्का, जगाला म्हटले - वाचवा नाही तर उद्धवस्त होऊन जाऊ

न्यूयॉर्क6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनवर हल्ला करण्याची घोषणा केल्यानंतर UN मध्ये यूक्रेनचे एंबेसडर सर्जी किस्लित्सिया भावुक झाले आहेत. त्यांनी जगाला आपला देश वाचवण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, आम्हाला वाचवा, रशिया आमच्या भूभागाला उद्ध्वस्त करत आहे. ते म्हणाले की, येथे बसून शांततेविषयी बोलत आहे आणि दुसरीकडे रशिया आमच्या भागात सैन्य पाठवत आहे.

एंबेसडरने UN ला म्हटले की, युद्ध थांबवणे ही या हाउसची जबाबदारी आहे. किस्लित्सिया यांनी सर्व देशांना आवाहन केले आणि सांगितले की, तुम्ही सर्वांना जे काही करता येईल ते करण्याचा प्रयत्न करा. याच्या उत्तरात, रशियन एंबेसरडर म्हणाले की, रशियाने लष्करी कारवाईला मान्यता दिली आहे, युद्ध घोषित केलेले नाही.

फायटर जेटवर रॉकेटने हल्ला, घरांमध्ये लपून आहेत लोत
युक्रेनच्या गृहमंत्र्यांनी सांगितले की, राजधानी कीवमध्ये आमच्या लढाऊ विमानावर रॉकेट डागण्यात आले आहे. आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर आम्ही सर्व विमानतळ रिकामे केले आहेत. त्याचवेळी, पूर्व आणि दक्षिण युक्रेनमधील लोक हल्ल्याच्या धोक्यामुळे घरांमध्ये लपून बसले आहेत. युक्रेनने कीव विमानतळावरून लोकांना बाहेर काढले आहे आणि देशभर मार्शल लॉ लागू केला आहे.

अमेरिकेने बोलावली आर्म सर्व्हिसची आपातकालिन बैठक
रशियन हल्ल्यानंतर अमेरिकन शस्त्रास्त्र सेवेची तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत युक्रेनला शस्त्रास्त्रे आणि पैसा देण्याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो. त्याचवेळी अमेरिकन काँग्रेसने मागणी केली आहे की, जो बायडेन यांनी रशियावर आणखी कठोर निर्बंध लादावे.

UN चे आवाहन - रशियाने मानवतेसाठी युद्ध थांबवावे
संयुक्त राष्ट्र संघातील बैठकीच्या शेवटी, संयुक्त राष्ट्राचे महासचिव एंटोनियो गुटेरेस यांनी रशियाला युद्ध थांबवण्याचे आवाहन केले आहे. मानवतेच्या फायद्यासाठी हा हल्ला थांबवावा, असे आवाहन गुटेरस यांनी पुतीन यांना केले. दुसरीकडे, रशियाच्या संरक्षणमंत्र्यांनी युक्रेनच्या शहरांवर हल्ले केले जाणार नाहीत आणि त्यांच्या एकाही नागरिकाला त्याचा धोका नसल्याचे म्हटले आहे.

पुतिन यांनी टेलिव्हिजन भाषणात केली युद्धाची घोषणा
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी प्रदीर्घ तणावानंतर गुरुवारी पहाटे 5 वाजता राष्ट्रीय टेलिव्हिजनवर हल्ला करण्याची घोषणा केली. नाझी राजवट हटवण्यासाठी आणि लष्करात सुधारणा करण्यासाठी ही मान्यता देण्यात आल्याचे पुतिन यांनी आपल्या भाषणात सांगितले. पुतिन यांनी जगाला सल्ला देताना म्हटले की, जर कोणी हस्तक्षेप केला तर त्याचे परिणाम खूप वाईट होतील. त्यांचा इशारा अमेरिका आणि नाटो सैन्याकडे होता.

बातम्या आणखी आहेत...