आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Ukraine Russia Waar | Marathi News | Protests In Several Russian Cities Against The Attack On Ukraine, 'Citizens Of Ukraine, Our Brothers'

रशियातील तरुणांचा विरोध, ‘नो टू वॉर’:युक्रेनवरील हल्ल्याच्या निषेधार्थ रशियातील अनेक शहरांत निदर्शने, ‘युक्रेनमधील नागरिक आमचे बांधव’

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन भलेही युक्रेनवर हल्ले चढवू लागले आहेत, परंतु स्वकीयांकडूनच त्यांना विरोध होत आहे. मॉस्को तसेच सेंट पीटर्सबर्गसारख्या शहरांतून त्यांना विराेध झाला. यात तरुणांची संख्या लक्षणीय होती. त्यात तरुणांनी पुतीन यांना उद्देशून ‘नो टू वॉर’ अशा घोषणा दिल्या. युक्रेनचे लोक रशियाचे बांधव आहेत. त्यांच्यावर हल्ले करणे अयोग्य असल्याचे निदर्शकांनी म्हटले आहे. पोलिसांनी एक हजार जणांना अटक केली.

युक्रेनवरील हल्ल्यानंतर अशा प्रकारे लोक पुतीन यांच्याविरोधात रस्त्यावर उतरण्यास पोलिसांनी परवानगी दिली नव्हती. आता पोलिसांनी विरोध थोपवण्यासाठी छापेमारी सुरू केली आहे. पोलिसांच्या कारवाया वाढल्या आहेत.
समर्थनार्थ युक्रेनचे ध्वज : मॉस्कोमध्ये अनेक ठिकाणी युक्रेनच्या समर्थनार्थ युक्रेनचे ध्वज फडकावण्यात आले होते. आंदोलनात सहभागी अनास्तासियाच्या डोळ्यात अश्रू होते. ती म्हणाली, युक्रेनवर हल्ले करणे योग्य नाही. पीटर्सबर्ग तसेच येकातरकिनबर्गमध्ये निदर्शनाच्या काळात लाठीमार झाला.

जगभरात विरोध : रशियाच्या विरोधात जगभरात निदर्शने होत आहेत. अमेरिकेत राहणाऱ्या युक्रेन नागरिकांनी न्यूयॉर्क, मिशिगन, डेट्रायट, वॉशिंग्टनमध्ये निदर्शने केली. जपान, तुर्की, स्पेन, जर्मनी, झेक प्रजासत्ताकमध्येही लोक युक्रेनविरोधी कारवाईचा निषेध करत आहेत.

पुतीन जगाचे नव्हे, ‘सिलाेविकी’चे ऐकतात
6 खास सिलोविकी म्हणजे पुतीन यांचे सिंडिकेट

1 गेनादी तेमशेंको | रशियाच्या उच्च कुळातील. गव्हर्नर ग्रुपचे सहसंस्थापक. अब्जाधीश ग्रेनादीचे वडील साेव्हिएत सैन्यात अधिकारी हाेते. ९० च्या दशकात ग्रेनादी यांच्याशी मैत्री गाढ झाली.

2 बोरिस रॉटनबर्ग | रशियातील धनाढ्य. सर्वात माेठ्या गॅस पाइपलाइन कंपनी स्ट्राॅगेजमाँथचे मालक. आता त्यांचे बंधू कंपनी चालवतात.

3 दिमित्री मेदवेदेव | विद्यमान पंतप्रधान. पुतीन यांचे सर्वात निकटवर्तीय. दाेन दशकांपासून पुतीन यांच्यासमवेत राजकीय जीवनात सक्रिय. रशिया सुरक्षा परिषदेचे डेप्युटी चेअरमन.

4 व्याचेस्लाव वोलोडिन रशियन संसद ड्युमाचे अध्यक्ष. | पुतीन यांच्या सर्व निकालांवर संसदेत माेहाेर लावण्यामध्ये महत्त्वाची भूमिका. युक्रेनच्या दाेन प्रांतांना स्वायत्त प्रदेश म्हणून प्रस्तावास मंजुरी मिळवली.

5 एलेग्जेंडर बोरतिनिकोव | अंतर्गत गुप्तचर यंत्रणा एफएसबीचे प्रमुख. पुतीन यांच्याविराेधातील असंताेषावर नजर ठेवतात.

6 सर्गेई नरयाशकिन | रशियाच्या परदेशी गुप्तचर संस्थेचे प्रमुख. जगभरात पुतीन यांचे डाेळे आणि कान असे काम करतात. पुतीनविराेधी नवेल्नी यांना विष पाजून मारण्याचा कट केल्याचा आराेप.

बातम्या आणखी आहेत...