आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेलं युद्ध अजूनही धगधगत असून कोणताही देश माघार घेण्याच्या मानसिकतेत नसल्याचे दिसत आहे. रशियाकडून सतत होत असलेल्या हल्ल्यामुळे युक्रेनमधील अनेक शहरे बेचिराख होण्याच्या मार्गावर असून हळूहळू देशातील दाहक स्थिती समोर येऊ लागली आहे. यातच चित्रपटांच्या सोनेरी पडद्यावर धाडसी स्त्रीची भूमिका साकारणारी हॉलिवूड स्टार अँजेलिना जोली हिने खऱ्या आयुष्यातही शौर्य दाखवले आहे. अँजेलिना जोली युक्रेनमध्ये पोहचली असून तीने युद्ध पीडितांची भेट घेतली. अँजेलिना जोली युक्रेनच्या लव्हीव शहरात युनायटेड नेशनची सदिच्छा दूत म्हणून आली आहे. समोर आलेल्या अनेक व्हिडिओंमध्ये ती युद्धग्रस्तांना भेटून त्यांचे धैर्य वाढवताना पाहायला मिळाली.
अँजेलिना जोली पीडितांची भेट घेत असताना रशियन सैन्याने हल्ला केल्याने शल्टरचा आश्रय घेतला. युक्रेनियन न्यूज साइट्सवर या घटनेचे व्हिडिओ समोर आले आहेत. या व्हिडिओमध्ये अँजेलिना जोली देखील लव्हीव शहरात बॉम्बस्फोटाचा सायरन वाजल्यानंतर बॉम्ब शेल्टरच्या दिशेने आश्रय घेण्यासाठी धावताना दिसत आहे.
अँजेलिना युक्रेनच्या समर्थनात -
रिपोर्ट्सनुसार, अँजेलिनाने UNHCR म्हणजेच संयुक्त राष्ट्र उच्चायुक्त शरणार्थीची विशेष दूत म्हणून अनेक वर्षे काम केले आहे. इथेही ती एक विशेष दूत म्हणून पोहोचली आहे. ती ल्विव्ह शहरातील एका बोर्डिंग स्कूलमध्येही गेली. जिथे तिने मुलांशी संवाद साधला आणि सेल्फी घेतले. तसेच युद्धात बेघर झालेल्या लोकांची आणि कर्माटोर्स्क स्टेशनवरील हल्ल्यात जखमी झालेल्यांचीही तीने भेट घेतली. युक्रेनमधून बाहेर काढलेल्या लोकांना वैद्यकीय आणि मानसिक आधार देणार्या स्वयंसेवकांनाही ती भेटली.
पोस्ट शेअर केली होती -
अँजेलिनाने युक्रेनच्या समर्थनार्थ पोस्ट शेअर केली होती. सर्वांप्रमाणे मीही युक्रेनच्या लोकांसाठी प्रार्थना करत आहे. यावेळी माझे लक्ष, माझ्या UNHCR सहकार्यांसह घरातून बेदखल झालेल्या आणि आसपासच्या परिसरात निर्वासित झालेल्या लोकांच्या हक्कांचे रक्षण करणे आहे. आम्ही आधीच मृत आणि लोक घर सोडल्याच्या बातम्या पाहिल्या आहेत, अशे तीने म्हटलं होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.