आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युक्रेन:युक्रेन : रशियाच्या 81 क्षेपणास्त्रांत अणुवीज केंद्राचे मोठे नुकसान

कीव्ह/मॉस्को20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रशियाने पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला केला. त्याने केवळ २४ तासांत ८१ क्षेपणास्त्रे डागून कीव्हसह १७ शहरांवर निशाणा साधला. या हल्ल्यात ११ लोकांचा मृत्यू झाला तर २० जखमी झाले. गेल्या तीन आठवड्यांतील हा पहिला मोठा हल्ला आहे. गुरुवारच्या हल्ल्यादरम्यान युक्रेनची ऊर्जा केंद्रे आणि निवासी परिसरांवरही क्षेपणास्त्रे डागली. संयुक्त राष्ट्राच्या एका अधिकाऱ्याने जैपोरिजिया अणु वीज केंद्रातील वीज पुरवठा ठप्प झाल्याचे सांगितले. यावर संयुक्त राष्ट्राने तत्काळ इशारा जारी केला आहे. दरम्यान, रशियाचा हल्ला पाहता संपूर्ण युक्रेनमध्ये हवाई सुरक्षा प्रणाली सक्रिय केली आहे. खारर्कीव्हचे गव्हर्नर ओलेह सिनेहुबोव म्हणाले, खारर्कीव्हमध्ये १५ वेळा हल्ला झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...