आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे नेतृत्व रशियाकडे!:युक्रेन म्हणाला, एप्रिल फूलचा विनोद आहे

न्यूयॉर्क2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

युक्रेनच्या आक्षेपानंतरही रशिया संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा शनिवारी अध्यक्ष झाला. युक्रेनने परिषदेतील सदस्यांना रशियाला रोखण्याचे आवाहन केले होते. मात्र, यात यश येत नसल्याचे दिसताच हा एप्रिल फूलचा सर्वात मोठा विनोद असल्याचे म्हटले.परिषदेच्या १५ सदस्यांपैकी प्रत्येक सदस्य एका महिन्यासाठी क्रमवार अध्यक्ष होतो. गेल्या वर्षी फेब्रुवारीत रशियाने युक्रेनवर हल्ला केला होता, तेव्हाही रशिया सुरक्षा परिषदेचा अध्यक्ष होता.

युक्रेनने अमेरिकेला विनंती केली होती की, हल्लेखोर देशाला सुरक्षा परिषदेचे अध्यक्ष होण्यापासून रोखावे. रशिया कायम सदस्य आहे, त्यांना पद स्वीकारण्यापासून कुणी रोखू शकत नाही, असे अमेरिकेचे म्हणणे होते.