आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Ukraine Vs Russia Waar | Marathi News | Ukraine Latest Update Marathi | Putin Will Now Surround The EU US By Installing A "key President" In Ukraine

युक्रेन-रशिया युद्ध:युक्रेनमध्ये आता ‘कळसूत्री राष्ट्रपती’ बसवून पुतीन ईयू-अमेरिकेला घेरणार

वॉशिंग्टन डीसीहून भास्करसाठी रोहित शर्मा6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पराभव बघून युक्रेनने चर्चेचे निमंत्रण धाडले, पुतीन यांनी स्वीकारले; आता पुढे...
  • 76 वर्षांनंतर तीच असहायता व पलायनाचे वेदनादायक चित्र

रशियाने युक्रेनवरील हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी राजधानी कीव्हची घेराबंदी केली. आधी क्षेपणास्त्रे डागली, नंतर १० हजार पॅराट्रूपर उतरवले. काही ठिकाणी युक्रेन सेनेने संघर्ष केला. बहुतांश ठिकाणी शस्त्रे टाकली. तज्ज्ञ याला निर्णायक युद्ध मानत आहेत. कीव्हवरील ताब्यानंतर युद्धविराम होऊ शकतो.

भारतीयांना रोमानियामार्गे आणणार
युक्रेनमधून भारतीयांना आणण्यासाठी २ विमाने पाठवली गेली. लोकांना युक्रेनचा शेजारी देश रोमानियामार्गे भारतात आणले जाईल. युक्रेनमध्ये २० हजार भारतीय राहतात. पैकी एक हजारपेक्षा जास्त लोकांना भारतात परतायचे आहे. भारतीयांना आणण्याचा सर्व खर्च केंद्र सरकार उचलेल. शेकडो भारतीय पोलंड आणि हंगेरीकडे गेले आहेत.

अनिश्चितता घटली, कच्चे तेलही स्वस्त
युद्ध सुरू होताच गुरुवारी सेन्सेक्स २,७०२.१५ अंकांनी (४.७२%) कोसळला होता. शुक्रवारी १,३२८.६१ अंक (२.४४%)सुधारला. कच्चे तेल गुरुवारी १०६ डॉलर/बॅरल झाले होते. शुक्रवारी ६.८७% घसरून ९८.५२ डॉलर/बॅरलवर आले. सोनेही १,८७३ रुपयांनी स्वस्त होऊन ५०,६६७ रुपये प्रति १० ग्रॅम झाले आहे.
सैनिकी गणवेशात गोपनीय स्थळी गेलेल्या राष्ट्रपती जेलेन्स्कींना रशियन सैन्य शोधत आहे.
५० लाख लोक सबवे स्टेशन-बंकरांत; १ लाखांनी देश सोडला

अमेरिका-नाटो विश्वास देत राहिले, आता गरज पडली तर एकटे सोडले
युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमिर जेलेन्सकींनी म्हटले की, ४ महिन्यांपासून अमेरिका, नाटोसारख्या शक्ती आम्हाला साथ देण्याच्या गप्पा करत राहिल्या. आता युद्धात आम्हाला एकट्याला सोडले. रशियाचे पहिले लक्ष्य मी आणि दुसरे लक्ष्य माझे कुटुंब आहे.

आता राजधानी कीव्हवर ताब्यासाठीचा शेवटचा संघर्ष.. १० हजार रशियन पॅराट्रूपर उतरले

राष्ट्रपती जेलेन्स्कींना पकडून त्यांच्याकडून बळजबरीने ‘शांतता करार’ करून युक्रेनचे नियंत्रण स्वत:कडे घेत रशिया युद्धविरामाची घोषणा करू पाहत आहे. दुसरीकडे जेलेन्स्कींच्या आवाहनावर कीव्हमध्ये लोक घरात पेट्रोलबॉम्ब बनवत आहेत. तरुणांना शस्त्रे पुरवली जात आहेत.

राष्ट्रपती जेलेन्स्कींचे दु:ख
हवाई हल्ल्यांपासून बचावासाठी युक्रेनमध्ये सबवे स्टेशन आणि बंकरमध्ये ५० लाखांवर लोक ठेवण्यात आले आहेत. यापूर्वी असे चित्र १९४५ मध्ये वर्ल्ड वॉर-२ दरम्यान दिसले होते. गेल्या दोन दिवसांत एक लाखावर लोक शेजारी देश पोलंड, रोमानिया, स्लोव्हाकिया, हंगेरी आणि मल्डोवात गेले आहेत. पोलंडमध्ये निर्वासित छावण्या उघडण्यात आल्या.

पुतीन म्हणाले- लोकांना युक्रेनने ढाल बनवू नये. आम्ही ताबा घेणार नाही. युक्रेनला स्वातंत्र्य देऊ. रशिया-युक्रेन युद्ध दोन दिवसांतच शेवटाकडे जात आहे. रशियन सेना युक्रेनची राजधानी कीव्हमध्ये शिरली आहे. पराभव समोर दिसत असल्याने युक्रेनने रशियन राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांना चर्चेचे निमंत्रण धाडले. पुतीन यांनीही शिष्टमंडळ पाठवू, असे सांगत म्हटले की, ‘रशिया युक्रेनचा ताबा घेणार नाही, तर त्याला स्वतंत्र करत आहे. युक्रेनमध्ये अणुबॉम्ब बनवू देणार नाही.’ रशियन परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले की युक्रेन सरकार शरण आल्यानंतरच ही कारवाई थांबेल.

इकडे वॉशिंग्टन डीसीमध्ये उच्चपदस्थ अमेरिकी अधिकारी आणि तज्ज्ञ म्हणताहेत की, पुतीन यांचे मनसुबे जवळपास यशस्वी झाले आहेत. ते लवकरच युक्रेनमध्ये रशियन समर्थकांचे नवे सरकार स्थापन करतील. याचा रिमोट कंट्रोल मॉस्कोत असेल. युद्धविरामाच्या काही आठवड्यांनंतर रशियन सेना युक्रेनमध्ये आपल्या लहान तुकड्या सोडून माघारी परतेल. पुतीन आता युक्रेनमध्ये ‘कळसूत्री सरकार’ बनवून ईयू आणि अमेरिकेसाठी नवे आव्हान निर्माण करतील. नवे सरकार स्थापून ते यावर शिक्कामोर्तब करतील. दुसरीकडे अमेरिका, ईयू, नाटो आणि यूएनसारख्या महाशक्ती दुसऱ्या दिवशीही घोषणाबाजीच करत राहिल्या.

बातम्या आणखी आहेत...