आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युक्रेनचा हल्ला:स्नेक आयलँडच्या रशियन तळांवर युक्रेनचा हल्ला; वर्चस्वासाठी रशियन सैन्याची दमछाक

कीव्हएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

युक्रेनवरील रशियाच्या हल्ल्याच्या कारवाईला चार महिने पूर्ण झाली आहेत. युक्रेनच्या हवाई दलाने मंगळवारी रशियाचे एक क्षेपणास्त्र, दोन ड्रोन व दोन दारूगाेळा तळ नष्ट केले आहेत. ही माहिती युक्रेनच्या हवाई दलाने फेसबुकवर दिली आहे. स्नेक आयलँडवर नियंत्रणासाठी रशिया संपूर्ण ताकद लावत असले तरी रशियाला वर्चस्व मिळवताना रशियन फाैजांची दमछाक हाेऊ लागली आहे. स्नेक आयलँड युक्रेन व रशिया यांच्यासाठी रणनीतीसाठी महत्त्वाचे मानले जाते. त्याद्वारे काळ्या समुद्र क्षेत्रात जाता येते.

रशियाचे लढाऊ हेलिकाॅप्टर एस्टाेनियात घुसले
रशिया व नाटाे देशांत आता थेट तणाव निर्माण हाेत असल्याचे दिसते. नाटाे सदस्य देश लिथुआनियाला धमकी देण्यात आल्यानंतर रशियाचे लढाऊ हेलिकाॅप्टर पहिल्यांदा एस्टाेनियाच्या सीमेत घुसले हाेते.