आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारशिया आणि युक्रेनमधील युद्धाला 312 दिवस पूर्ण होत आहे. युक्रेनच्या सैन्यानेही ख्रिसमस आणि नवीन वर्षांच्या दिवशी रशियन हल्ल्यांना प्रत्युत्तर दिले. याचे अनेक व्हिडिओ आणि फोटोही समोर आलेले आहेत. नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये सांताक्लॉजच्या वेशात युक्रेनच्या विमानातील पायलट क्षेपणास्त्र डागताना दिसून येत आहे.
मिग-29 या लढाऊ विमानातून क्षेपणास्त्र डागली
हा व्हिडिओ Ukraine_defense अकाउंटने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. फायटर पायलटने युक्रेन एअरफोर्सच्या मिग-29 फायटर जेटमधून हल्ला केल्याचे कॅप्शनमध्ये म्हटले आहे. त्याने रशियनला लक्ष्य करित अमेरिकन मिसाईल AGM-88 HARM डागले. हे हवेतून पृष्ठभागावर जाणारे, रेडिएशन विरोधी क्षेपणास्त्र आहे. मिग-29 जेटमध्ये दोन AGM-88 मिसाईन आणि दोन R-37 शॉर्ट रेंज मिसाईल असतात. R-37 हे हवेतून हवेतच मारा करणारे मिसाईल आहे.
2 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला व्हिडिओ
ही क्लिप इंस्टाग्रामवर दोन लाखांहून अधिक लोकांनी पाहीली गेली आहे. या पोस्टला 20 हजारांहून अधिक लोकांनी लाईकही केले आहे. एका यूजरने कमेंटमध्ये लिहिले - यावेळी सांताला इतर महत्त्वाचे काम होते, त्यामुळे मला गिफ्ट मिळाले नाही. आणखी एका यूजरने लिहिले- या सांतासमोर कोणीही उभे राहू शकत नाही. अनेक युजर्सने रशिया आणि युक्रेनमधील युद्ध संपुष्टात यावे, अशा भावना व्यक्त केल्या. तर अनेक जण म्हणाले की, सांतालाही रशियनांना हरवायचे आहे.
यासंबंधित अन्य बातम्या देखील वाचा
रशिया युक्रेनवर करित आहे ड्रोन हल्ला:कीवमध्ये 4 तास हवाई हल्ल्याचे सायरन वाजले; नववर्षाच्या पूर्वसंध्येला 400 रशियन सैनिक ठार
नववर्षाचा दुसरा दिवस सुरू होण्यापूर्वीच रशियाने युक्रेनवर ड्रोनने हल्ला करण्यास सुरुवात केली. या हल्ल्यांमध्ये युक्रेनची राजधानी कीवमधील पायाभूत सुविधांना टारगेट केले जात आहे. राज्यपाल ओलेक्सी कल्यूबा यांनी टेलिग्रामवर रशियन हल्ल्यांची माहिती दिली. हल्ल्यांमुळे डेस्निआन्सकी जिल्ह्यात इमारतीचा ढिगारा पडून एका 19 वर्षांचा मुलगा जखमी झाला. संपूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा
2023 मधील जगातील 5 मोठ्या अंतराळ मोहिमा:पहिल्यांदाच 1 लाख किलोचे यान पाठवणार अमेरिका, जपानचे 8 लोक चंद्रावर जातील
2023 हे वर्ष अंतराळ तंत्रज्ञानासाठी सुवर्णवर्ष मानले जात आहे. कारण आहे 5 मोठ्या मोहिमा, ज्यांच्यामुळे लोकांचे अंतराळाविषयीचे आकलन वाढेल. हे आहेत-युरोपीय अंतराळ संशोधन संस्थेचे ज्युपिटर आईसी मून्स एक्सप्लोरर आणि सुपर हेवी स्पेसएक्स स्टारशिपचे प्रक्षेपण. जपानच्या 8 सदस्यीय दलाचे मिशन डिअरमून. नासाच्या यानाचे सर्वात महत्वाचे लघुग्रहाचे नमुने पृथ्वीवर परत आणण्याचे आणि भारतीय खासगी अंतराळ कंपनी स्कायरूटच्या पहिल्या 3डी प्रिंटेड रॉकेटचे उपग्रहासह प्रक्षेपण. संपूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.