आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युक्रेनी मीडियाचा दावा:युक्रेन सरकारचे मनोधैर्य खचलेले नाही, रशियन लष्कराच्या सैन्य ताफ्याचा वेग थांबला आहे

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

काळाच्या ओघात अतिशय बलाढ्य वाटणारा रशिया कमजोर होत चालला आहे. युक्रेनच्या दाव्यानुसार, 24 फेब्रुवारीला झालेल्या हल्ल्यानंतर रशियन सैन्याने 6 मार्चपर्यंत कब्जा करण्याची योजना आखली होती. मात्र युक्रेनच्या पलटवारामुळे रशियाला अडचणींचा सामना करावा लागत आहे. रशियन सैन्याच्या सीक्रेट डॉक्यूमेंटच्या आधारावर युक्रेन जॉइंट फोर्स ऑपरेशनने हे दावे केलेआहेत. सैन्याने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या हाती सीक्रेट बॅटलफील्ड ऑपरेशनचे दस्तावेज लागले आहेत.

युक्रेनियन मीडियाच्या मते, रशियन सैन्याकडे फक्त दोन आठवड्यांचे तेल आणि रेशन होते. ते आता संपण्याच्या मार्गावर आहे. शहरांवर पूर्णपणे ताबा न घेतल्यामुळे रशियन सैन्याचे लॉजिस्टिक देखील गंभीर समस्येत आहे.

युक्रेनियन सरकारचे मनोधैर्य खचण्यासाठी कीव्ह ताब्यात घेणे आवश्यक असल्याचे कागदपत्रांमध्ये म्हटले आहे. युक्रेनचे दुसरे शहर खार्किव एविएशन इंडस्ट्री आणि एयरस्पेसचा मोठा इंपोर्ट सेंटर आहे. मारियोपूल हे सर्वात मोठे बंदर आहे, त्यामुळे क्रीमियामार्गे रशियन क्षेत्राशी जोडण्यासाठी त्यावर कब्जा देखील महत्त्वपूर्ण आहे. रशियन लष्कराच्या 65 किमी लांबीच्या लष्करी ताफ्याचा वेगही थांबला आहे.

मागे हटण्यास तयार नाही युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्सकी
युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमायेर झेलेन्सकी युद्धाच्या तेराव्या दिवशी मंगळवारी कीव्हमधील सरकारी कार्यालयात दाखल झाले. त्यांनी त्याचा व्हिडिओ करून पोस्ट केला आणि आपले लोकेशनदेखील जाहीर केले. आपल्या कार्यालयातून व्हिडिो जाहीर करण्याची झेलेन्सकी यांची मागील तेरा दिवसांतील ही पहिलीच वेळ आहे. झेलेन्स्की म्हणाले, मी पळून गेलेलो नाही. पळणारही नाही. युक्रेनला नो फ्लाय झोन घोषित करण्याची मागणी या वेळी त्यांनी नाटोकडे केली.

रशियन सैन्य कीव्हपासून 35 किमी अंतरावर गोस्टोमेलमध्ये बॉम्बवर्षाव करत असतानाच झेलेन्सकी कार्यालयात आले होते. त्यातच एस्टोनियाचे पंतप्रधान काजा कलास म्हणाले, अमेरिकेला युक्रेनच्या शेजारील राष्ट्रात नाटो सैन्याची संख्या वाढवावी लागेल. आता पुढील हल्ल्यानंतरच रशिया आगेकूच करेल, असा युरोपीय देशांचा अंदाज आहे.

रशियाला दर्जा हवा आहे
दुसरे कारण म्हणजे दर्जा. रशियाला जो दर्जा सोव्हिएत युनियनमध्ये होता तोच दर्जा पुतीन यांना हवा आहे. अलीकडे रशियाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर सोव्हिएत युनियन एक मोठी शक्ती म्हणून उदयास येत होती. रशियाला युरोपीय देशांवर वर्चस्व मिळवायचे होते. त्यामुळे रशियाचे युरोपीय देशांशी संबंध बिघडले. अमेरिकेला रशियाच्या या परिस्थिचीचा फायदा घ्यायचा आहे, म्हणून युक्रेनने नाटो आणि युरोपियन युनियनचे सदस्य व्हावे अशी अमेरिकेची इच्छा आहे. यातून अमेरिका सर्वात मोठी शक्ती म्हणून उदयास येऊ शकते.

बातम्या आणखी आहेत...