आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जपानमध्ये विक्रमी उष्णता:शाळेला जाताना उष्णतेचा त्रास होऊ नये म्हणून छत्री देणार

टोकियो24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जपानमध्ये लोक उष्णतेने हैराण झाले आहेत. यंदा देशात पारा सरासरी ३५ अंशांवर नोंदवण्यात आला. जपान सरकारने शाळांतील विद्यार्थ्यांची संख्या रोडावू नये म्हणून त्यांना फायबर ग्लासच्या छत्र्या देण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनानंतर विद्यार्थ्यांनी उष्णतेचा बहाणा करून शाळा बुडवू नये, असाही सरकारचा उद्देश आहे.

सैतामा प्रांतातील कुमागायामध्ये अधिकारी म्हणाले, या छत्रीचे वजन ३३६ ग्रॅम आहे. ही छत्री जपानमधील प्राथमिक शाळांतील ९ हजार विद्यार्थ्यांना वाटली जाणार आहे. विद्यार्थ्यांना कोरोनाकाळातही उष्णतेपासून बचावाची सूचना देण्यात आली होती.सरकारच्या या निर्णयामुळे पालकांना दिलासा मिळाला आहे. शाळेतील हजेरीही त्यामुळे वाढेल.

बातम्या आणखी आहेत...