आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायुक्रेनने पुन्हा एकदा रशियावर युद्ध वॉर क्राईम म्हणजे युद्ध गुन्हा केल्याचा आरोप केला आहे. युक्रेनने दावा केला आहे की, रशियन सैनिकांनी त्यांच्या एका निशस्त्र युद्ध सैनिकाची हत्या केली आहे. याचा एक व्हिडिओ देखील जारी करण्यात आला आहे.
व्हिडिओमध्ये एक सैनिक सिगारेट ओढताना दिसत आहे. तेव्हाच त्याच्यावर गोळ्या झाडायला सुरूवात झाली. ज्यात त्याचा मृत्यू होतो. त्यांच्या हत्येचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की - आमच्या सैनिकाच्या मृत्यूचा आम्ही नक्कीच बदला घेऊ.
व्हिडिओमध्ये काय दाखवण्यात आले ?
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक सैनिक त्याच्या खंदकात उभाल राहून सिगारेट ओढत आहे. त्याचवेळी तो काही तरी बोलत आहे. बीबीसीच्या म्हणण्यानुसार, तो म्हणत होता की, युक्रेनने जिंकले पाहिजे. तेव्हाच त्याच्यावर ऑटोमेटीक गनमधून गोळ्या झाडल्या जातात.
व्हिडिओमध्ये रशियन सैनिकाचा आवाज असल्याचेही बीबीसीने म्हटले आहे. रशियन सैनिक म्हणतो की - लो मरो..! आतापर्यंत मृत्यू झालेल्या युक्रेनच्या सैनिकाची आणि त्याला मारणाऱ्या रशियन सैनिकाची ओळख पटलेली नाही.
आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयाकडे चौकशीची मागणी
युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमित्रो कुलेबा यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयाकडे केली आहे. युक्रेनमध्ये रशियन नरसंहार केला जात असल्याचा हा आणखी एक पुरावा असल्याचे त्यांनी सांगितले. तर झेलेन्स्कीने मृत सैनिकाचे वर्णन शूर योद्धा म्हणून केले. त्यांनी युक्रेनच्या जनतेला त्यांचे शेवटचे शब्द नेहमी लक्षात ठेवण्याचे आवाहन केले आहे.
युक्रेनने यापूर्वीही रशियावर युद्ध गुन्ह्यांचे आरोप केले
युक्रेनने यापूर्वी रशियन सैनिकांवर युक्रेनियन नागरिकांचा छळ, बलात्कार आणि हत्या केल्याचा आरोप केला आहे. गेल्या वर्षी जुलैमध्ये एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये युक्रेनच्या डोनबास भागात युक्रेनियन सैनिकांना नपुंसक बनवले जात असल्याचा दावा करण्यात आला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.