आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • UNICEF Claims 1.5 Million Ukrainian Children Are Feared To Be Sold, Zelensky Calls For Direct Talks With Putin

युक्रेन हल्ल्याचा 25 वा दिवस:UNICEF चा दावा-15 लाख युक्रेनी बालकांची विक्री होण्याची भीती, झेलेंस्की यांचे पुतीन यांना थेट चर्चेचे आवाहन

मॉस्को/कीव्ह2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रशिया-युक्रेन युद्धाचा आजचा 25 वा दिवस आहे. यूनिसेफने दुसऱ्या देशांत आश्रय घेतलेल्या जवळपास 15 लाख युक्रेनी मुलांची खरेदी-विक्री सुरू होण्याची भीती व्यक्त केली आहे. तर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेंस्की यांनी एका व्हिडिओ संदेशाद्वारे थेट रशियन अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांना चर्चेचे आवाहन केले आहे.

झेलेंस्की यांनी स्वित्झर्लंडलाही रशियन धनदांडग्यांचा पैसा जप्त करण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले, यूरोपियन शहरांत राहून स्विस बँकेत पैसे ठेवणारे रशियन श्रीमंत आपल्या सैन्याला युक्रेनला उद्ध्वस्त करण्यासाठी आर्थिक रसद पोहोचवत आहेत.

न्यूयॉर्क टाईम्सच्या वृत्तानुसार, यूनिसेफने रशियाच्या युक्रेनवरील हल्ल्यानंतर नागरिकांसह जवळपास 15 लाख मुलांनी शेजारच्या देशांत आश्रय घेतला आहे. शरणार्थी शिबिरांतील या मुलांवर मानवी तस्करांची नजर असून, ते या मुलांची खरेदी-विक्री करण्याच्या बेतात आहेत.

यूनिसेफने युक्रेनमधील अगणित मुलेही आपली घरेदारे सोडून दुसऱ्या क्षेत्रांत आश्रय घेण्यासाठी मजबूर झाल्याचे म्हटले आहे.

झेलेंस्कींची इच्छा असली तरी, पुतीन चर्चेला तयार नाहीत -तुर्की

राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे रशियाला आथेट चर्चेचे आवाहन केले आहे. पण, पुतीन सध्यातरी अशा कोणत्याही चर्चेला तयार नसल्याचे तुर्कीचे अध्यक्ष रिसेप तय्यप एर्दोगान यांच्या मुख्य सल्लागाराने स्पष्ट केले आहे. पुतीन यांना नेत्यांच्या पातळीवरील बैठकीची वेळ अद्याप आली नसल्याचे वाटते, असे एर्दोगान यांचे प्रवक्ते इब्राहिम कलीन यांनी म्हटले आहे.

रशियाची पूर्वेत आगेकूच, दक्षिणेत युक्रेनी लष्कराने रोखले

न्यूयॉर्क टाईम्सच्या वृत्तानुसार, युक्रेनियन लष्कराने रशियाला राजधानी कीव्ह, खार्किव्ह व दक्षिण युक्रेनच्या एका मोठ्या भागात अडवून धरले आहे. सॅटेलाईट इमेजमध्येही कीव्हच्या वेशीवर रशियन सैन्य प्रदिर्घ काळापर्यंत युद्ध करण्यासाठी डेरा टाकून बसल्याचे दिसून येत आहे.

रशियन लष्करी पुरवठा साखळी विस्कळीत झाल्यामुळे असे झाल्याचे सांगण्यात येते. या वृत्तात रशियन सैन्य पूर्व युक्रेनमध्ये वेगाने घौडदौड करत असल्याचाही दावा करण्यात आला आहे. या भागात रशियन सैनिक बंडखोरांच्या ताब्यातील पश्चिम युक्रेनच्या डोनबास क्षेत्रातून मोर्चा उघडला आहे.

आजचे अपडेट्स...

अमेरिका, युक्रेनमध्ये नो-फ्लाय झोन स्थापन करणार नाही. पेंटागनने ही घोषणा केली आहे. तथापि, अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टीन यांनी रशिया युक्रेनमध्ये पुढे सरकण्यासाठी सातत्याने दक्षिण युक्रेनमध्ये पुढे सरकण्यासाठी अत्यंत क्रूर व पाशवी पद्धतीचा वापर करत असल्याचा आरोप केला आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनीही शुक्रवारी चिनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी संवाद साधून युक्रेनच्या मुद्यावर चर्चा केली. बायडेन यांनी चीनला रशियाला कोणतीही मदत करण्यापासून दूर राहण्याचा इशारा दिला आहे.

'सीएनएन'नुसार, युक्रेनचे माजी राष्ट्राध्यक्ष पेत्रो पोरोशेंको यांनी बायडेन यांना पुढील आठवड्यात होणाऱ्या नाटो परिषदेसाठी ब्रुसेल्समध्ये आल्यानंतर युक्रेनचा दौरा करण्याचे निमंत्रण दिले आहे. ते म्हणाले -युक्रेनचे चांगले मित्र असणाऱ्या बायडेन यांनी आम्हाला पाठिंबा दर्शवण्यासाठी हा दौरा केला पाहिजे. बायडेन 24 मार्च रोजी नाटो समिटमध्ये सहभागी होतील.

युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने रशियाने आतापर्यंत 1403 हवाई, तर 459 क्षेपणास्त्र हल्ले केल्याचा दावा केला आहे. पण, अमेरिकेने बीबीसीकडे रशियाने तब्बल 1080 क्षेपणास्त्र डागल्याचा दावा केला आहे. पोप फ्रांसिस यांनी रोमच्या रुग्णालयात दाखल 19 युक्रेनी मुलांची भेट घेतली. त्यांनी यावेळी रशियावर टीका करताना युक्रेनमध्ये पक्षपाती हितांसाठी सत्तेचा घृणास्पद गैरवापर होत असल्याचा आरोप केला आहे.

युक्रेनमध्ये बॉम्बस्फोटांमुळे जमिनदोस्त झालेल्या इमारतींच्या ढिगाऱ्यातून लोकांना बाहेर काढण्यासाठी स्वयंसेवकांचा तुटवडा तयार झाला आहे. यामुळे ब्रिटनने आपल्या फायर वर्कर्सला युक्रेनच्या मदतीसाठी पाठवले आहे.

रशियाच्या हायपरसॉनिक क्षेपणास्त्राच्या हल्ल्यात 40 युक्रेनी सैनिक ठार

न्यूयॉर्क टाईम्सच्या वृत्तानुसार, रशियाने शनिवारी युक्रेनवर प्रथमच हायपरसॉनिक क्षेपणास्त्राचा हल्ला केला. हा हल्ला मायकोलाईव्ह शहरातील 36 व्या युक्रेनी नेव्हल इंफ्रंट्री ब्रिगेड मुख्यालयाच्या शस्त्रागारावर करण्यात आला.

युक्रेनच्या एका उच्चपदस्थ लष्करी अधिकाऱ्याने या हल्ल्यात आपल्या 40 सैनिकांचा बळी झाल्याचे सांगितले आहे. तथापि, मुख्यालयाची इमारत पूर्णतः जमिनदोस्त झाल्यामुळॆ मृत्तांचा आकडा वाढण्याची भीती आहे.

लव्हीव्ह शहराच्या ऐतिहासिक सिटी सेंटरमध्ये युद्धात मारल्या गेलेल्या मुलांना श्रद्धांजलीवाहण्यासाठी 109 रिकाम्या ट्रॉली व बेबी सीट्स उभ्या करण्यात आल्या आहेत. युक्रेनचे प्रोसिक्युटर जनरल यांच्या कार्यालयाने या युद्धात आतापर्यंत 112 मुलांचा बळी गेल्याचा व 130 हून अधिक जण जखमी झाल्याचा दावा केला आहे.

युक्रेन युद्धामुळे झालेले नुकसान...

जापोरिज्जिया शहरातील गोळीबारात 9 जण ठार, तर 17 जण जखमी झालेत. उपमहापौर अनातोली कुर्तिव्ह यांनी शहरात 38 तासांची संचारबंदी लागू केली आहे.

ब्रिटीश संरक्षण मंत्रालयानुसार, रशियाने युक्रेनच्या हल्ल्यात व्हॅक्युम बॉम्बचा वापर केला आहे. यात मोठ्या प्रमाणात नागरिकांचा बळी गेला आहे.

लव्हीव्ह शहराच्या महापौरांनी शुक्रवारी रशियाने एका विमान दुरुस्ती प्रकल्पावर क्षेपणास्त्रांचा हल्ला करुन ते नष्ट केल्याचा दावा केला आहे.

CNN च्या वृत्तानुसार, युक्रेनी डिजिटल ब्रॉडकास्टर हरोमादस्कने रशियावर आग्नेय युक्रेनमधून आपल्या व्हिक्टोरिया रॉसचीना नामक रिपोर्टरचे अपहरण केल्याचा आरोप केला आहे. रॉसचीना 12 मार्चला रशियाच्या ताब्यातील एनर्होदार शहरातून बेपत्ता झाल्या होत्या.

हल्ल्याच्या 3 दिवसांनंतरही 1300 महिला-मुलांचा पत्ता नाही

मारियुपोलमधील 1300 महिला व मुले लपलेल्या ड्रामा थिएटरचा ढिगारा हटवण्याचे काम तिसऱ्या दिवशीही सुरू होते. पण, त्यात अद्याप एकही मृत्तदेह आढळला नाही. यामुळे हे सर्वजण सुखरूप असल्याचा दावा केला जात आहे. या थिएटरवर 3 दिवसांपूर्वी रशियन विमानांनी हल्ला केला होता. त्याचे तीव्र पडसाद उमटले होते.

मॅक्सरने शनिवारी या थिएटरचे नवे उपग्रहीय छायाचित्र जारी केले. त्यात ते पूर्णतः उद्ध्वस्त झाल्याचे दिसून येत आहे. पण, त्याच्या गेटवर रशियन भाषेत लिहिण्यात आलेला चिल्ड्रन हा शब्द आजही दिसून येत आहे. तिथ लपलेल्या मुलांसाठी हा शब्द लिहिण्यात आला होता. मॅक्सरने थिएटरचे हल्ल्यापूर्वीचे एक छायाचित्रही जारी केले आहे.

5 पैकी एका युक्रेनी नागरिकाने देश सोडला -UNHRO

न्यूयॉर्क टाईम्सच्या वृत्तानुसार, संयुक्त राष्ट्र मानवाधिकार कार्यालयाने (UNHRO) युद्धामुळे मुलभूत सुविधांपासून जिवनावश्यक वस्तुंचा प्रचंड तुटवडा झाल्याने युक्रेनच्या 5 पैकी एका नागरिकाने दुसऱ्या देशात आश्रय घेण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत 44 लाख लोकांनी युक्रेन सोडले आहे.

UNHRO नुसार, 24 फेब्रुवारी रशियाने हल्ला केल्यानंतर युक्रेनच्या किमान 847 नागरिकांचा बळी गेला आहे. यात 44 मुलांचाही समावेश आहे. पण, युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी आतापर्यंत 112 मुलांचा बळी गेल्याचा दावा केला स्वतः मानवाधिकार कार्यालयानेही मृत्तांचा आकडा फार मोठा असल्याचा दावा केला आहे.

रशियन अंतराळपटूंनी घातला युक्रेनच्या राष्ट्रध्वजासारखा पोशाख

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर हजर असणाऱ्या रशियाच्या 3 अंतराळपटूंनी शुक्रवारी निळ्या रंगाचे बॅज असलेले पिवळ्या रंगाचे फ्लाईट सूट घातले होते. त्यांचा हा फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यांनी आपल्या देशाविरोधात युक्रेनचे उघडपणे समर्थन केल्याची चर्चा सुरु झाली आहे.

बेलारुसचे रुग्णालय रशियन सैनिकांनी भरले -रिपोर्ट

बेलारुसच्या सोशल मीडिया वाहिन्यांनी युक्रेनमधील हल्ल्यानंतर जखमी रशियन सैनिकांनी बेलारुसचे अनेक रुग्णालये भरल्याचा दावा केला आहे. काही वृत्तांत युद्धात शहीद झालेल्या रशियन सैनिकांचे मृतदेह रेल्वेद्वारे नेताना दाखवण्यात आले आहे. मृत्तांचा आकडा कमी दाखवण्यासाठी असे केले जात असल्याचा दावा केला जात आहे.

बातम्या आणखी आहेत...