आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:घटस्फोट घेऊन आईने कोट्यवधींची संपत्ती नेऊ नये म्हणून मुलाने पित्याच्या संपत्तीची माहिती दडवली

लंडन24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • इंग्लंडमध्ये कुटुंब न्यायालयात घटस्फोटाचे अनोखे प्रकरण उजेडात

इंग्लंडच्या एका कुटुंब न्यायालयात घटस्फाेटाचे अनाेखे प्रकरण समाेर आले आहे. त्यात एका मुलाने पित्याच्या संपत्तीशी संबंधित माहिती आईपासून लपवली. कारण काय तर घटस्फाेटानंतर आई काेट्यवधींची संपत्ती घेऊन निघून जाईल, असे त्याला वाटले. न्यायालयाने मात्र महिलेच्या बाजूने निवाडा केला.इंग्लंड वेल्सच्या उच्च न्यायालयात २०१६ मध्ये रशियाचे उद्याेजक फरहाद अख्मेदाेव आणि तातियाना यांच्या घटस्फाेटाचे प्रकरण आले हाेते. सुनावणीनंतर न्यायालयाने घटस्फाेटाचा अर्ज मंजूर करताना पती फरहादला आदेश दिला. काेट्यवधींच्या संपत्तीपैकी तातियानाला ४१.५ टक्के एवढा वाटा द्यावा, असे आदेश काेर्टाने फरहादला दिले.

घटस्फाेटादरम्यानच्या नुकसान भरपाईची रक्कम म्हणून अतिरिक्त ७० दशलक्ष युराे मिळावे, अशी तातियानाची मागणी हाेती. कारण ६५ वर्षीय पतीने मुलगा तैमूर (२७) याच्या मदतीने काही संपत्ती दडवली आहे. मुलाने हा आराेप खाेटा असून याचिका रद्द करण्याची विनंती केली. सुनावणीदरम्यान तातियाना म्हणाल्या, फरहाद अझरबैजानमध्ये जन्माला आले. तेल व गॅसच्या उद्याेगातून पैसा कमावल्यानंतर ते रशियात सिनेटर झाले. २०१८ मध्ये अमेरिकी सरकारने जाहीर केलेल्या रशियाचे उद्याेजक व राजकीय व्यक्तींच्या यादीतही त्यांचे नाव समाविष्ट हाेते.

फरहाद हे एेषारामाचे शाैकीन आहेत. त्यांनी चेल्सी फुटबाॅल क्लबचे मालक राेमन अब्रामाेविच यांच्याकडून ११५ मीटरची याॅट एमव्ही लुनाही खरेदी केली. संपत्ती लपवण्यासाठी फरहादने लिकटेंस्टीनमध्ये ट्रस्ट व कलासंग्रहालयाला ती हस्तांतरित केले. मुलाचे खाेटे उघडे पडले तेव्हा कुटुंब पुन्हा एकत्र राहावे यासाठी खाेटे बाेलल्याचा दावा मुलाने केला. पण न्यायाधीश नाेल्स यांनी आईच्या बाजूने निर्णय दिला.

कुुटंुबात प्रत्येक व्यक्तीला केवळ पैशांची चिंता
माझ्या काेर्टात हजर राहणारे अख्मेदाेव कुटुंब आजपर्यंतच्या कुटुंबांमधील सर्वात नाराज कुटुंब वाटले. या प्रकरणात कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला पैसा व संपत्तीची जास्त काळजी आहे. पती पत्नीपासून लपवताेय. पत्नीला या गाेष्टी मिळवायच्या आहेत. येथे जजने रशियन कादंबरी ‘अॅना कॅरनिना’ चा हवाला दिला. सगळी सुखी कुटुंबे सारखी असतात. परंतु प्रत्येक दु:खी कुटुंबाच्या दु:खाची कथा वेगळी असते. -जज ग्वेनेथ नोल्स, निकाल वाचताना.

बातम्या आणखी आहेत...