आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमेरिकेतील अॅटलांटा आणि जॉर्जियासारख्या लहान शहरांत ‘मॅन अप’ नावाचे क्लिनिक प्लास्टिक सर्जरीसाठी पुरुषांमध्ये लोकप्रिय ठरत आहेत. या क्लिनिकचे संस्थापक आणि प्लास्टिक सर्जन डॉ. ब्रँडन ली यांनी गेल्या काही वर्षांत पुरुषांत कॉस्मेटिक सर्जरीच्या मागणीत मोठी वाढ बघितली. या नव्या ट्रेंडला ‘डॅडी डू-ओव्हर’ म्हटले जात असून, ते महिलांच्या प्लास्टिक सर्जरीच्या ‘ममा मेकओव्हर’ पासून प्रेरित आहे. संपूर्ण अमेरिकेत असे क्लिनिक वेगाने सुरू होत आहेत. अमेरिकन सोसायटी ऑफ प्लास्टिक सर्जनच्या मते दरवर्षी अमेरिकेत १३ लाख पुरुष प्लास्टिक सर्जरी करताहेत. तज्ज्ञांच्या मते हा ट्रेंड चकित करणारा आहे. आजवर पुरुष याला अनावश्यक मानत होते. या स्पर्धेत टेक व्यावसायिकांपासून ते अधिकारी व विद्यार्थीही आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, सुंदर दिसण्याने त्यांना चांगले वाटते. डॉ. ली म्हणाले की, बहुतांश पुरुषांना अॅथलिट लूक हवाय. तासन्तास जिममध्ये घालवताहेत, असे लोकांना वाटावे. परिणामी ब्राझिलियन बट लिफ्ट्स सर्जरीची सर्वाधिक मागणी आहे. याच्यात बटवरील (मागील भाग) अतिरिक्त चरबी हटवली जाते. ८ लाख रु. खर्च येतो. मस्क्युलर शरीरासाठी लिपोसक्शन सर्जरीत पोट, छातीवरील चरबी हटवली जाते. तज्ज्ञांच्या मते प्लास्टिक सर्जरीचे काही दुष्परिणामही आहेत. फेसलिफ्ट सर्जरीनंतर अनेक आठवडे सूज, वेदना, अस्वस्थता राहते. संसर्गाचा धोका सर्वाधिक असतो.
‘बॅटमॅन’च्या चेहऱ्यासाठी टेक व्यावसायिक करताहेत सर्जरी
पुरुष आपल्या नाक व जबड्याला नवा आकार देताहेत. त्यांना बॅटमॅनसारखा चेहऱ्याचा आकार हवा आहे. यात झूम मीटिंग करणाऱ्या टेक व्यावसायिकांची संख्या अधिक आहे. याला झूम इफेक्ट म्हटले जात आहे. अॅबडॉमिनल इम्प्लांटचा खर्च ४ लाख रु. येतो. पोटावरील चरबी हटवून सिक्स पॅकचा आकार देण्यासाठी सिलिकॉन प्रत्यार्पित केले जाते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.