आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमेरिका लसींच्या तुटवड्यामुळे कोरोना लसीकरण कार्यक्रमात मागे पडली आहे. ब्रिटनच्या लाइफ-सायन्सेस डेटा कंपनी एअरफिनिटीने आपल्या अहवालात हा दावा केला आहे. आतापर्यंत अमेरिकेत गरजेपेक्षा अनेकपट जास्त लसींचा साठा असून निर्यात करता येऊ शकते, असे म्हटले जात होते. अमेरिकेने लसी निर्यातही केल्या. अमेरिका फायझर व मॉडर्नाच्या लसीला आपल्या लसीकरण कार्यक्रमाचा कणा मानते. या कंपन्या एप्रिलपर्यंत २० लाख लसींची निर्मिती करत होत्या. जूनमध्ये कंपनीच्या उत्पादनात घट होऊन ते दरदिवशी ७.५ लाखांवर आले. अमेरिकेत एप्रिलमध्ये लोकांना दररोज ३० लाख डोस दिले जात होते. जूनमध्ये दररोज १० लाख डोस दिले जाणार आहेत. शहरातील लोक स्वत: लसीकरणासाठी येतील, असे आरोग्य विभागाला वाटू लागले. परंतु तसे घडले नाही. सुमारे ३३ टक्के तरुणांनी लस घेण्यात रस दाखवला नाही.
दक्षिण-पूर्व, पूर्व आशिया : यंदा रुग्णसंख्येत वाढ
गेल्या वर्षी दक्षिण-पूर्व व पूर्व आशियात कोरोना जास्त विक्राळ होऊ शकला नव्हता. यंदा मात्र या क्षेत्रात कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढू लागले आहेत. लसीकरणातील घट संसर्ग प्रतिबंधाच्या प्रयत्नांना अयशस्वी करत आहे. थायलंडमध्ये शुक्रवारी १० हजार नवे रुग्ण आढळले. त्यापैकी ९,२७६ रुग्ण कम्युनिटी स्प्रेडचे आहेत. एका दिवसात येथे ७३ कोरोना रुग्णांचाही मृत्यू झाला.
कोविड-१९ बूस्टर डोसच्या उपयोगितेवर संशय
कोविड-१९ बूस्टर डोस विषाणूशी लढण्यास किती सक्षम आहे यावर जागतिक आरोग्य संघटनेने संशय व्यक्त केला आहे. फायझर-बायोएनटेकच्या म्हणण्यानुसार डोसचा परिणाम लसीकरणाच्या सहा महिन्यांनंतर कमी होऊ लागतो. त्यामुळेच उपयोगिता स्पष्ट दिसून येत नाही. फायझर अमेरिकेच्या नियामक संस्थेकडून बूस्टर डोसच्या मंजुरीसाठी तयारी सुरू आहे.
डेल्टा व्हेरिएंटचे रोजचे रुग्ण प्रमाण ९३ टक्के
अमेरिकेत रोज डेल्टा व्हेरिएंटचे ९३ टक्के काेरोना रुग्ण आढळून आले आहेत. कोविड व्हेरिएंट ऑर्गने हा दावा केला ब्रिटनमध्ये अशा प्रकारच्या रुग्णांची संख्या ९८ टक्के आहे. अमेरिकेत गुरुवारी १९,३४७ नवे रुग्ण आढळून आले. येथे तीन दिवसांपासून रोज १५ हजारांहून जास्त नवे रुग्ण आढळून आले आहेत. अमेरिकेत ४८ लाख ५१ हजार ३७५ सक्रिय रुग्ण आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.