आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • University Of Birmingham Research | Risk Of Memory Loss Due To Nightmares 4 Days A Week; 59% Risk In Men, 41% In Women

संशोधन:आठवड्यात 4 दिवस वाइट स्वप्ने पडल्याने स्मरणशक्ती जाण्याचा धोका; पुरुषांत 59%, महिलांत 41% जोखीम

लंडन2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वप्ने पाहणे सामान्य बाब आहे. काही लोकांना नेहमी वाईट स्वप्ने येतात. त्यामुळे अनेकदा ते अचानक झोपेतून उठतात. ३५ ते ६४ वर्षे वयात आठवड्यातून चार दिवस वाईट स्वप्ने आल्याने स्मरणशक्ती जाण्याची जोखीम वाढते.

वस्तुत: वाईट स्वप्ने पाहिल्याने गंभीर न्यूरोलॉजीकल डिसऑर्डर होण्याची शक्यता वाढत असल्याचे नुकत्याच बर्मिंगहम विद्यापीठाच्या एका संशोधनातून समोर आले. विशेष म्हणजे ७९ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना केवळ ५ टक्केच वाईट स्वप्ने येतात. तर ४१ टक्के महिला आणि ५९ टक्के पुरुषांवर वाईट स्वप्नांचा खोलवर परिणाम होतो. हा मध्यवर्ती मज्जासंस्थेचा एक आजार असल्याचे संशोधनातून कळाले. तो तुमचे दैनंदिन जीवनातील कामकाज प्रभावित करतो. यामुळे लोकांना अवयवांमध्ये कंपण होण्याची समस्या होते. ज्या लोकांनी आठवड्यातून कमीत कमी एकदा वाईट स्वप्न पाहिले त्यांच्यात पुढील एक दशक वाइट स्वप्ने न पाहणाऱ्यांच्या तुलनेत चारपट अधिक स्मरणशक्ती गमावण्याची जोखीम असते, असे संशोधनात आढळले. दुसरीकडे वृद्धांनी वाइट स्वप्ने पाहिल्यानंतर त्यांची स्मरणशक्ती जाण्याचे निदान होण्याची शक्यता दुप्पट होते.

या संशोधनात ६०० पेक्षा जास्त मध्यम वयोगटातील प्रौढ आणि ७९ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या २,६०० लोकांचा समावेश करण्यात आला होता. पुरुषांत वाढत्या वयात वाईट स्वप्ने आल्याने धोका वाढतो.

कमी व्यायाम, धूम्रपानामुळेही स्मरणशक्ती जाण्याचा धोका संशोधनाचे प्रमुख लेखक डॉ. अबिदेमी ओटाइकू म्हणाले, अनेकदा चुकीचा आहार, कमी व्यायाम, धूम्रपान, अधिक मद्यपानानेही स्मरणशक्ती जाण्याची जोखीम असते. प्राथमिक लक्षणे शोधून याचे पूर्णपणे निदान केले जाऊ शकते.

बातम्या आणखी आहेत...