आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युरोप:30 पैकी 20 देशांत अनलॉक, आठवड्यात निर्बंधही होतील शिथिल

लंडन, पॅरिस, रोम, माद्रिदएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • लसीकरणाचा वेग वाढताच युरोपमधील परिस्थितीत चांगली सुधारणा

जगभरात कोराेना महामारीचे केंद्र राहिलेला युरोप हळूहळू पूर्वपदावर येत आहे. दक्षता बाळगून न्यू नॉर्मलच्या दिशेने आता पावले पडू लागली आहेत. येथील विविध देशांत लसीकरणाचा वेग वाढत असल्याने महामारी पसरण्याचा वेग मंदावू लागला आहे. अनेक देशांनी फिरण्यावरील बंदी हटवली आहे. ब्रिटनमध्ये लसीकरणानंतर जवळपास अनलॉक अशी स्थिती पाहायला मिळू लागली आहे. १७ मेपासून ब्रिटन पूर्ण अनलॉक होऊ शकते. तसे तर विषाणूच्या नव्या प्रतिरूपाने चिंता वाढवली आहे. युरोपबद्दल बोलायचे झाल्यास ३० पैकी २० देश अनलॉक होत आहेत. काही देशांत सशर्त अशा स्वरूपात कार्यक्रमांना परवानगी देण्यात आली आहे. कोरोनाचा सर्वाधिक फटका खाणाऱ्या इटली, स्पेन व फ्रान्समध्ये हॉटेल, रेस्तराँ, पर्यटनस्थळ व आंतरराष्ट्रीय प्रवासास टप्प्याने परवानगी देण्यात आली आहे.

१९ मेपासून या देशातील बंदी हटवली जाणार
ऑस्ट्रिया : १९ रोजी रेस्तराँ, हॉटेल, सिनेमागृहे, क्रीडा संस्था सुरू होणार आहेत. निगेटिव्ह अहवाल दाखवल्यावर प्रवेश. लसीकरण झालेल्या आंतरराष्ट्रीय पर्यटकांनाही परवानगी. डेन्मार्क : दुकाने, रेस्तराँ सुरू. रेस्तराँमध्ये आत बसण्याची परवानगी. ऑर्डर अॅपवरून द्यावी लागेल. निगेटिव्ह रिपोर्ट किंवा लसीकरण चालेल. १९ मेपासून युरोपीय संघातील लोकांना ये-जा करण्याची परवानगी.

बातम्या आणखी आहेत...