आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षण:अमेरिकन शाळांमधील विद्यार्थी संख्येत 25 टक्क्यांपर्यंत घट

छत्रपती संभाजीनगर20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेत शहरी भागातील शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या कमी होत आहे. लोकसंख्येच्या दरात आणि इतर देशांतून येणाऱ्या लोकांच्या संख्येत घट झाल्यामुळे २०२० पर्यंत दहा वर्षांत देशातील मुलांची संख्या १० लाखांनी कमी झाली. अनेक मोठ्या शहरांत आणखी एक समस्या आहे. लोक शहर सोडून छोट्या शहरांत जात आहेत. शिकागोच्या मुख्य पब्लिक स्कूल डिस्ट्रिक्टमध्ये (सरकार व ट्रस्टच्या मदतीने चालणाऱ्या शाळा) दहा वर्षांत विद्यार्थ्यांची संख्या वीस टक्क्यांनी कमी झाली. लॉस एंजलिसमध्ये २५ टक्क्यांनी घट झाली आहे. अधिकारी म्हणतात की, २०३० पर्यंत आणखी २५ टक्के घट होऊ शकते. महामारीमुळे ही समस्या वाढवली. न्यूयॉर्क शहरातील सार्वजनिक शाळांमधील विद्यार्थ्यांची नोंदणी महामारीनंतरच्या तीन वर्षांत १०% कमी झाली आहे. आसपासच्या भागात ही घसरण २० टक्क्यांपर्यंत आहे. विद्यार्थ्यांच्या कमतरतेमुळे काही शहरांमध्ये शाळा बंद करण्याची गरज वाढत आहे. टुलेन युनिव्हर्सिटीचे डग्लस हॅरिस म्हणतात की, चार्टर शाळा बंद होण्याचा दर ५% आणि खासगीचा १% आहे. स्थानिक सरकारच्या मते, शिकागोमधील एकतृतीयांश शाळा इमारती अर्ध्या रिकाम्या आहेत. जॉर्जटाउन युनिव्हर्सिटीमधील शालेय वित्त विषयातील तज्ज्ञ मार्गारेट रोझा म्हणतात, काही शहरी शाळाच समस्यांवर गांभीर्याने विचार करत आहेत. महामारीमुळे मिळालेल्या अतिरिक्त मदतीमुळे ज्या भागात विद्यार्थ्यांची नोंदणी कमी झाली तेथेही शाळा संघटनांनी जास्त पगार आणि बोनस मागितले आहेत. त्यामुळे पुढील वर्षी आणखी समस्या निर्माण होतील.

बातम्या आणखी आहेत...