आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Up To 80 Percent Of Deaths Of Persons Who Were On Ventilators, New York Becomes Corona's New Hub In The World

न्यूयाॅर्क:व्हेंटिलेटरवर जाणारे 80 टक्के मृत्यूच्या खाईत, आता नव्या पर्यायाच्या शोधात; जगात न्यूयॉर्क बनले कोरोनाचे नवे केंद्र

न्यूयॉर्क3 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • न्यूयॉर्कमध्ये कोरोना युरोपातून तर चीनमधून कॅलिफोर्नियात प्रादुर्भाव

न्यूयॉर्क जगात कोरोनाचे नवे केंद्र बनले आहे. जगात कोणत्याही देशात संसर्गाची एवढी संख्या न्यूयॉर्कएवढी नाही. येथे दररोज सरासरी १० हजार रुग्ण येत आहेत. न्यूयॉर्कचे अधिकारी म्हणाले, कोरोनाचा संसर्ग झालेल्या लोकांना व्हेंटिलेटरवर ठेवले जात आहे. परंतु त्यापैकी ८० टक्के लोकांचा मृत्यू होत आहे. चीन व ब्रिटनमधूनही अशा बातम्या येऊ लागल्या आहेत. 

वॉशिंग्टन विद्यापीठातील मेडिकल स्कूलच्या क्रिटिकल केयर स्पेशालिस्ट डाॅक्टर टिफनी ऑस्बर्न म्हणाले, व्हेंटिलेटरमुळे रुग्णांच्या फुफ्फुसांची हानी होऊ शकते. न्यूयॉर्कमधील डॉक्टर नेगिन हजीजादेह म्हणाले, न्यूमोनिया असलेल्या रुग्णांसाठी व्हेंटिलेटरचा उपयोग होत आहे. परंतु कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांचे त्यामुळे नुकसान होत आहे. आता डाॅक्टर व्हेंटिलेटरसाठी पर्याय शोधू लागले आहेत. म्हणूनच व्हेंटिलेटर देण्याऐवजी रुग्णांना आता नाकात ट्यूब टाकून ऑक्सीजन दिले जात आहे. काही डॉक्टर तर रुग्णांना आॅक्सीजनमध्ये नायट्रिक ऑक्सीजन टाकून देत आहेत. त्यामुळे रक्त प्रवाह वाढू शकतो.

न्यूयॉर्कमध्ये कोरोना युरोपातून तर चीनमधून कॅलिफोर्नियात प्रादुर्भाव

न्यूयॉर्क विद्यापीठातील संशोधनानुसार डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान अमेरिकेत सुमारे २६ लाख लोक इटली, स्पेन व ब्रिटनमधून आले होते. या दरम्यान पश्चिम किनाऱ्यावर ७.५ लाख लोक चीनमधून आले. पूर्व अमेरिकेतील रुग्णांत कोरोना युरोपातून आल्याचे मानले जाते. पश्चिमेकडील भागात मात्र तो चीनमधून आले. पूर्व अमेरिकेत न्यूयॉर्क, वॉशिंग्टन डीसीचा समावेश होतो. पश्चिम भागात कॅलिफोर्निया, वॉशिंग्टन राज्य येतात.

न्यूयॉर्कमध्ये हायड्रॉक्सीक्लोरिक्वीनचा दुरुपयोग वाढला, लोक सर्रास वापरतायहेत     

अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोनावरील उपचारासाठी मलेरियाला रोखणारे आैषध हायड्रॉक्सीक्लोरोक्विनला प्रभावी असल्याचे सांगितले होते. त्यानंतर देशात त्याचा दुरुपयोग वाढला. लोक डॉक्टरांचा सल्ला न घेताही त्याचा वापर करू लागले आहेत. कोरोना संसर्ग नसलेले लोकही दक्षता म्हणून ही आैषधी घेत आहेत. फोर्ब्सच्या अहवालानुसार १८ मार्च ते ६ एप्रिल दरम्यान या आैषधीची विक्री दुप्पट झाली. मधुमेही व्यक्तीने हे आैषध घेतल्यास ते प्राणघातकही ठरू शकते. ट्रम्प यांचे पर्सनल वकील रुडी ज्युलियानी यांनीही या आैषधीचा प्रसार केला.

बातम्या आणखी आहेत...