आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

युराेपीय कमिशनच्या पहिल्या महिला प्रमुख यांच्या भावुक भाषणातून वेदना:तुर्की राष्ट्रपतींसाेबतच्या बैठकीत खुर्ची मिळाली नव्हती,महिला असल्यामुळे सूटबूटवाल्यांत एकटी पडले हाेते

बुसेल्स10 दिवसांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • समाजात समानतेसाठी आणखी बराच काळ लागेल हे स्पष्ट : उर्सुला

युराेपीय कमिशनच्या पहिल्या महिला प्रमुख उर्सुला वाॅर डेर लेयेन यांनी याच महिन्यात तुर्कीत झालेल्या घटनेवर आपबीती जाहीर केली. उर्सुला व युराेपीय काैन्सिलचे प्रमुख चार्ल्स मिशेल यांनी द्विपक्षीय चर्चेसाठी तुर्कीचे राष्ट्रपती एर्दाेगन यांची भेट घेतली हाेती. यादरम्यान बैठक कक्षेत केवळ दाेन खुर्च्या हाेत्या. त्यावर एर्दाेगन व मिचेल बसले. उर्सुला यांना मात्र तेथे ताटकळत उभे राहण्याची वेळ आली. त्यांना खुर्ची देऊ करण्याचाही शिष्टाचार दाखवण्यात आला नव्ता. त्यामुळे उर्सुला यांना नाइलाजाने तेथील एका साेफ्यावर बसावे लागले हाेते. हा प्रसंग आठवून उर्सुला भावुक झाल्या.

युराेपीय संसदेत त्यांनी भावुक भाषण केले. उर्सुला म्हणाल्या, राष्ट्रपती एर्दाेगन यांच्या भेटीत सहकारी मिचेलने एकमेव खुर्ची घेतली. तेव्हा मी खूप व्यथित झाले. सुटाबुटातील पुरुषांत मला एकटे वाटत हाेते. केवळ एक महिला असल्यामुळे मला अशी वाईट वागणूक देण्यात आली. युराेपीय कमिशनची अध्यक्ष हाेणारी मी पहिली महिला आहे. अशा प्रकारची वागणूक मिळेल असे मला वाटलेही नव्हते. केवळ एक महिला असल्याने मला अशी वर्तणूक देण्यात आली. मीदेखील सूटबूट घालून पुरुष असते तर? त्यांनी मला अशी वागणूक दिली असती? तेथे कॅमेरा हाेता हे बरे झाले. फाेटाे आणि व्हिडिआे जगाने पाहिला. त्यातून सगळ्या गाेष्टी स्पष्ट हाेतात.

हा मुद्दा खुर्चीचा नव्हे, आपण काेण हे दाखवणारा : उर्सुला
उर्सुला म्हणाल्या, हा मुद्दा प्राेटाेकाॅल किंवा खुर्चीचा आहे, म्हणून हा मुद्दा मांडला असे नव्हे. यातून आपण काेण आहाेत? आपली मूल्ये काेणती आहेत? युराेपीय संघ त्यावर उभा आहे. महिलांशी नेहमीच प्रत्येक ठिकाणी असाच दुय्यम व्यवहार केला जाताे.

बातम्या आणखी आहेत...