आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • US: 71% Agree With British Problem Of Racism, 6 Out Of 10 Americans Say Palis Discriminate Against Blacks

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:अमेरिका : 71% इंग्रजांना मान्य - वंशवाद माेठी समस्या, 10 पैकी 6 अमेरिकी म्हणाले, पाेलिस कृष्णवर्णीयांबराेबर भेदभाव करतात

जिओवनी रसेनलो9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वंशवाद, पाेलिसांच्या अत्याचाराविराेधात अमेरिकेच्या पहिल्यांदाच माेठ्या प्रमाणावर मतैक्य

पाेलिसांकडून जाॅर्ज फ्लाॅइड यांचा मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण अमेरिकेत निदर्शने हाेत आहेत. आता खूप काही गाेष्टी बदलतील असे वाटत आहे. हे बराेबरही आहे. कारण सध्याच्या स्थितीत अमेरिकन नागरिकांचे विचारही बदललेले दिसत आहेत. जवळपास ७६% अमेरिकन नागरिकांनी वंशभेद आणि भेदभाव सगळ्यात माेठी समस्या असल्याचे मान्य केले हाच याचा माेठा पुरावा आहे. २०१५ नंतर म्हणजे केवळ ५ वर्षांतच असे मान्य करणाऱ्यांचे प्रमाण २६ टक्क्यांनी वाढले असून त्यामध्ये बहुतांश इंग्रज आहेत ही विशेष गाेष्ट आहे. त्यातही आश्चर्यकारक गाेष्ट म्हणजे ७१ टक्के इंग्रजांनी याला सहमती दाखवली आहे हे विशेष.

वंशवाद, पाेलिसांचा भेदभाव तसेच कृष्णवर्णीयांवर अत्याचार हाेत असल्याचे मान्य करणे हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात माेठे मतैक्य आहे. ज्या मिनाेपाेलिसमध्ये जाॅर्ज फ्लाॅइडबराेबर घटना घडली तेथील २०% कृष्णवर्णीय लाेकसंख्या आहे. यात ९ टक्के कृष्णवर्णीय पाेलिस नाेकरी करतात. तरीही मिनाेपाेलिसमध्ये कृष्णवर्णीयच पाेलिसांच्या अत्याचाराला जास्त बळी पडत आहेत. तसे बघायला गेले तर संपूर्ण अमेरिकेतच त्यांच्याशी भेदभाव केल्याची अनेक उदाहरणे दिसून येतात. परंतु पाेलिसांच्या अत्याचाराबाबत सांगायचे तर मिनाेपाेलिसमध्ये गाेऱ्या अमेरिकनांच्या तुलनेत कृष्णवर्णीयांवर हाेणाऱ्या अत्याचारांचे प्रमाण ७ पट जास्त असते.

नागरी अधिकारांसंदर्भात काम करणारे वकील आणि डेमाॅक्रसी फाॅर कलरचे संस्थापक स्टीव्ह फिलिप म्हणाले, देशात जे काही हाेत आहे ते एेतिहासिक आहे. ही निश्चितपणे एका माेठ्या बदलाची तयारी आहे. याशिवाय पाेलिसांचा निधी कमी करून ती रक्कम सामाजिक कार्यासाठी उपयाेगात आणली जावी, असे माझे मत आहे.

बातम्या आणखी आहेत...