आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • US Agency CDC Changes Website, Animals And Contaminated Surfaces Are Not The Main Means Of Spreading The Virus

महत्वाची माहिती:कोरोनाचे 1000 पार्टिकल्स शरीरात गेल्याशिवाय माणसाला संक्रमण होत नाही; अमेरिकन एजंसीने सांगितले, कुठे स्पर्श केल्यास किती धोका

वॉशिंग्टन2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रिव्ह्यू आणि संशोधनानंतर सीडीसीच्या वेबसाइटवर सुधारित निर्देश जारी करण्यात आले

भारतासह अनेक देशांमध्ये कोरोनासोबत जगण्याची पद्धत शिकवली जात आहे. लॉकडाउन उघडले तरीही कोरोना संक्रमणाचा धोका काही कमी झालेला नाही. अशात लोकांनी बाहेर पडताना किंवा कुणाचीही भेट घेताना त्यांना कोरोनाच्या संसर्गाचा कितपत धोका आहे हे अमेरिकेच्या एका आरोग्य संस्थेने समजावून सांगितले आहे. अमेरिकेतील आरोग्य संस्था सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन सीडीसीने कोरोना व्हायरस संदर्भात काही नवीन निर्देश जारी केले आहेत. सीडीसीच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, कोरोना व्हायरस प्रामुख्याने माणसातून माणसांतच पसरतो. एखाद्या पृष्ठभागाला स्पर्श केल्याने सहसा संक्रमण होत नाही. कोणत्या ठिकाणी धोका अधिक आणि कोणत्या ठिकाणी कमी यासंदर्भात यात मार्गदर्शन करण्यात आले आहे. एखाद्या व्यक्तीच्या शरीरात कोरोना व्हायरसचे 1000 पेक्षा अधिक कण गेल्याशिवाय त्याला संक्रमण होत नाही असे यातून स्पष्ट करण्यात आले आहे.

संस्थेच्या माहितीप्रमाणे, कुठल्याही दूषित पृष्ठभाग किंवा संक्रमित जनावरापासून या व्हायरसचा फैलाव सहसा होत नाही. सीडीसी प्रवक्त्या ख्रिस्टन नॉर्डलंड यांच्या मते, अंतर्गत संशोधन आणि चाचण्यांमधून हे निष्कर्श समोर आले आहेत.

ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घ्या...

 

आधी सांगितले होते पृष्ठभागातून होतो फैलाव

सीडीसीच्या वेबसाइटने आपल्या जुन्या निर्देशांमध्ये म्हटले होते की एखाद्या व्यक्ती कुठल्याही संक्रमित ठिकाणाला स्पर्ष केल्यानंतर आपल्या नाक आणि तोंडाला स्पर्श केल्यास कोव्हिड 19 चा संसर्ग होऊ शकतो. परंतु, व्हायरसच्या फैलावासाठी प्रामुख्याने ही बाब कारणीभूत नाही. या व्हायरसच्या फैलावावर दिवसेंदिवस माहिती गोळा केली जात आहे.

तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता

सीडीसीच्या वेबसाइटवर करण्यात आलेल्या बदलांमुळे तज्ज्ञ चिंतीत आहेत. कोलंबिया युनिव्हर्सिटी मेलमन स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ मध्ये व्हायरोलॉजी (संक्रमण शास्त्र) तज्ज्ञ एंजेला रासम्युसेन म्हणतात, की महामारी संदर्भात स्पष्ट सूचना जारी करण्याच्या बाबतीत कमतरता आहे. वेबसाइटवर बदलण्यात आलेल्या निर्देशांमुळे हीच गोष्ट स्पष्ट होत आहे.

बातम्या आणखी आहेत...