आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमेरिकेत शुक्रवारी कडाक्याच्या थंडीमुळे आर्क्टिक ब्लास्ट झाला. यामुळे क्षेत्रातील तापमानात कमालीची घसरण नोंदवण्यात आली. न्यू हॅम्पशायरच्या माउंट वॉशिंग्टनमध्ये टेम्परेचर उणे 79 डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचले.
घटत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर न्यूयॉर्कसह न्यू इंग्लंडच्या मेसाच्युसेट्स, कनेक्टिकट, रोड आयलँड, न्यू हॅम्पशायर, व्हर्मोंट व मेनमधील जवळपास 16 दशलक्ष नागरिकांसाठी इशारा जारी करण्यात आला आहे. मेनमध्ये 1981 नंतर प्रथमच एवढी थंडी पडली आहे. यामुळे प्रशासनाने जनतेसाठी 150 शेल्टर सुरू केलेत. संपूर्ण क्षेत्रात रक्त गोठवणारी थंडी पडल्यामुळे सर्वच कार्यक्रम रद्द करण्यात आलेत.
आर्क्टिक स्फोट म्हणजे काय?
उत्तर ध्रुवालगतचा भाग आर्क्टिक म्हणून ओळखला जातो. आर्क्टिक ब्लास्टमध्ये या भागातील थंड हवेचा एक मोठा गोळा कॅनडामार्गे अमेरिकेत पोहोचतो. त्यामुळे अमेरिकेच्या बहुतांश भागातील तापमानात अचानक घट नोंदवली जाते. या स्थितीत तापमान काही तासांत 11 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त घसरू शकते. मैदानी भागात तापमान -57°C पर्यंत खाली येऊ शकते.
बोस्टनमध्ये वॉर्म सेंटर्सची स्थापना
थंडीमुळे बसची वाट पाहणाऱ्या किंवा पायी चालणाऱ्या विद्यार्थ्यांना हायपोथर्मिया व हिमबाधा टाळण्यासाठी बोस्टन, वॉर्सेस्टर व मॅसॅच्युसेट्समधील शाळांना सुट्टी घोषित करण्यात आली आहे. बोस्टनच्या मेअरनी शहरात आणीबाणी जाहीर करून उबदार केंद्रे उघडली आहेत.
हवामान तज्ज्ञांच्या मते, ही थंडी ‘वन्स इन अ जनरेशन’ असल्याचे म्हटले आहे. माउंट वॉशिंग्टन स्टेट पार्कमध्ये ईशान्येतील सर्वात उंच शिखरावर उणे 46 तापमान नोंदवण्यात आले. तर बोस्टनमध्ये उणे 13, वॉर्सेस्टर -मेसाच्युसेट्समध्ये उणे 16 तापमना नोंदवण्यात आले. ही थंडी येत्या काही दिवसांत आणखी वाढण्याची भीती आहे.
कॅनडातून येणाऱ्या वाऱ्यांमुळे तापमानात घट
शुक्रवारी कॅनडातून अमेरिकेच्या दिशेने वाहणाऱ्या आर्क्टिक वाऱ्यांमुळे तापमानात मोठी घट झाली होती. कॅबेटोगामा, मिनेसोटा, ओंटारियो जवळ दुपारी 1च्या सुमारास अमेरिकेतील दिवसातील सर्वात थंडी नोंदवण्यात आली. येथील तापमान -39 अंश होते. कॅनडाचे हवामान केंद्र युरेका येथे शुक्रवारी सकाळी -41 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
टेक्सासमध्ये थंडीपासून दिलासा
ईशान्येतील घटत्या तापमानासह दक्षिणेतील काही भाग व टेक्सासमध्ये बर्फाळ थंडीनंतर तापमानात वाढ झाली आहे. या ठिकाणी थंडीमुळे अनेक ठिकाणी पाऊस व बर्फवृष्टीमुळे वीज पुरवठा बाधित झाला होता. पण आता येथील हवामान सुधारले आहे. शुक्रवारी ऑस्टिन, टेक्सासमध्ये 11 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले. हे तापमान सोमवारपर्यंत 22 डिग्रीपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.