आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमेरिकेतील शाळांमध्ये शिकणाऱ्या हजारो मुलांना त्यांची संमती न घेता लष्करी करिअरकडे ढकलले जात आहे. 'न्यूयॉर्क टाइम्स'च्या वृत्ताने याबाबत खुलासा केला आहे. अहवालात म्हटले आहे की, देशभरात अशा अनेक सार्वजनिक शाळा आहेत. ज्या यूएस मिलिटरीच्या 'ज्युनियर रिझर्व्ह ऑफिसर ट्रेनिंग कॉर्प्स' म्हणजेच JROTCमध्ये शिकणाऱ्या मुलांना जबरदस्तीने भरती करत आहेत.
अमेरिकेतील डेट्रॉइट शहरातील पर्शिंग हायस्कूलमध्ये शिकणाऱ्या अँड्रिया थॉमसने न्यूयॉर्क टाइम्सला याबाबत माहिती दिली आहे. ती म्हणाली की, शाळेच्या पहिल्या दिवशी, जेव्हा मी माझ्या शाळेचे वेळापत्रक पाहिले. तेव्हा मला कळले की, मला माझ्या संमतीशिवाय JROTC वर्गात मला प्रवेश देण्यात आला आहे. मी अनेकवेळा शाळा प्रशासनाला यापासून बाजूला करण्याची विनंती केली. पण त्यानंतरही त्यात बदल झाला नाही. अँड्रियाप्रमाणेच अनेक मुलांनी आणि त्यांच्या पालकांनी टाइम्सशी या कोर्सबद्दल चिंता व्यक्त केली.
प्रथम JROTC प्रोग्राम काय आहे ते जाणून घ्या
मुळात यूएस मिलिटरी अमेरिकेतील जेआरओटीसी प्रोग्रामला निधी देते. यामध्ये मुलांना सैन्यात भरती होण्यासाठी तयार केले जाते. प्रवेश घेणाऱ्या सर्व मुलांना नेतृत्व, विविध कौशल्ये, शिस्त शिकण्यासाठी कठोर प्रशिक्षणातून जावे लागते. या कार्यक्रमाचे प्रशिक्षण लष्करातून निवृत्त सैनिकांना दिले जाते. अमेरिकेत सुमारे 3500 शाळांमध्ये त्याची केंद्रे आहेत. असे मानले जाते की, या प्रशिक्षणातून उत्तीर्ण झाल्यानंतर बहुतेक मुले सैन्यात करिअर बनल्याच्या दिशेने जातात. कार्यक्रमात समाविष्ट करण्यात आलेली बहुतांश मुले ही कृष्णवर्णीय आहेत.
टाइम्सने JROTC कार्यक्रमाविषयी सत्य उघड करण्यासाठी 200 हून अधिक रेकॉर्ड तपासले. डझनभर शाळांमध्ये हा उपक्रम सक्तीचा केल्याचे समोर आले. म्हणजेच शाळेत प्रवेश घेणाऱ्या मुलांना या प्रशिक्षणातून जावे लागणार आहे. या प्रशिक्षणात दाखल करण्यात आलेली बहुतांश मुले ही कृष्णवर्णीय असून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील कुटुंबातील असल्याचेही या अहवालात समोर आले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.