आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तणाव वाढत चालला:अमेरिकी बॉम्बवर्षाव विमानांचे आता मिशन ‘मिडल ईस्ट’

दुबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिका व इराण यांच्यातील आण्विक करार फिसकटल्यापासून तणाव वाढत चालला आहे. त्यामुळे अमेरिकेचे अण्वस्त्रसज्ज बी-५२ बॉम्बवर्षाव विमानांनी मध्यपूर्वेत युद्धसरावांतर्गत उड्डाण घेतले. या विमानांनी ब्रिटनच्या फेअरफोर्डमध्ये रॉयल एअर फोर्सच्या तळावरून उड्डाण घेतले होते. तेथून त्याचे पूर्वेकडील भूमध्यसागर, अरब सागरी क्षेत्र, लाल समुद्राच्या आकाशावरून उड्डाण झाले. त्यासोबत कुवेत, सौदीची लढाऊ विमानेही होती. मध्यपूर्वेत अमेरिकेच्या हवाई दलाचे वरिष्ठ अधिकारी लेफ्टनंट एलेक्सस ग्रिनकेविच इराणचा नामोल्लेख टाळून म्हणाले, अमेरिका व सहकारी देशांसमोर येणाऱ्या आव्हानांना असे प्रत्युत्तर दिले जाईल.

अमेरिकन ड्रोन चोरण्याचा प्रयत्न : अमेरिकेच्या नाैदलाने गेल्या आठवड्यात पर्शियन खाडीत इराणच्या एका जहाजाला सागरी ड्रोनवर नियंत्रण मिळवण्यापासून रोखले होते. इराणचे जहाज अमेरिकेच्या ड्रोनला चोरण्याच्या प्रयत्नात होते. ही घटना इराणपासून जवळ असलेल्या पर्शियन खाडीत झाली.

बातम्या आणखी आहेत...