आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यू नॉर्मल:अमेरिकेची सीमा 19 महिन्यांनंतर खुली; लसीचे दोन डोस अनिवार्य, कॅनडा-मेक्सिकोला जाणे शक्य, इतर देशांबाबत लवकरच निर्णय

5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हवाई मार्ग : प्रवाशांसाठी निगेटिव्ह प्रमाणपत्र गरजेचे

कोरोनाकाळानंतर अमेरिकेने आता देशाच्या सीमा खुल्या करण्यास सुरुवात केली. या दिशेने राष्ट्रपती ज्यो बायडेन यांनी मोठे पाऊल उचलले आहे. १९ महिन्यांनंतर कॅनडा व मेक्सिकोजवळील सीमा खुली केली आहे. आता लोक रस्ते किंवा हवाई मार्गे दोन्ही देशांना भेटी देऊ शकतील. परंतु प्रवासासाठी लसीचे दोन्ही डोस घेणे अनिवार्य आहे. नोव्हेंबरपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू होईल. इतर देशांतून येणाऱ्या लोकांसाठीदेखील निर्बंध हटवण्याबाबतचा निर्णय लवकर घेतला जाईल. अशा प्रकारचे निर्बंध हटवण्याच्या बायडेन प्रशासनाच्या निर्णयाकडे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला वेग देण्याचे प्रयत्न म्हणून पाहिले जात आहे. आतापर्यंत अमेरिकेने महत्त्वाच्या नसलेल्या प्रवासावर निर्बंध लागू केलेले होते.

फ्रान्स : हेल्थ पास अनिवार्य. पर्यटकांसाठी लसीचे दोन डोस अनिवार्य आहेत. सोबतच विमानतळावरच आरोग्यविषयक पास घेणे अनिवार्य आहे. इजिप्त : पिरॅमिड पाहण्यासाठी सर्व देशांतून लोक मोठ्या संख्येने भेट देतात. इजिप्तने कोणत्याही देशातील पर्यटकांवर बंदी घातलेली नाही. बर्म्युडा : क्वाॅरंटाइनची गरज असतानाही कॅरिबियन बेट समूहाचे प्रमुख पर्यटनस्थळ बर्म्युडाही पर्यटकांसाठी खुले केले आहे. परदेशींना दाेन्ही डाेस अनिवार्य. बाली बेट : इंडोनेशियातील प्रमुख पर्यटनस्थळ बाली बेट आता १७ महिन्यांनंतर सुरू करण्यात आले आहे. चीन, जापान, दक्षिण कोरिया, न्यूझीलंडच्या प्रवाशांना मुभा आहे.

न्यूयॉर्क :आतापर्यंत ५ हजार कोटी रुपयांचे नुकसान

न्यूयाॅर्कचे डेमोक्रॅटिक सिनेटर क्रिस्टन गिलीबँड म्हणाले, प्रवाशांवरील निर्बंधांमुळे त्यांच्या राज्याची आतापर्यंत ५ हजार कोटी रुपयांची हानी झाली आहे. ते म्हणाले, आता निर्बंध हटवण्यात आल्याने रहदारीला सुरुवात झाली आहे. पर्यटकांचा ओघ वाढल्याने अर्थव्यवस्थेला गती मिळेल.

हवाई मार्ग : प्रवाशांसाठी निगेटिव्ह प्रमाणपत्र गरजेचे
रस्तामार्गे कॅनडा व मेक्सिकोला ये-जा करणाऱ्यांना कोरोना लसीचे दोन डोस घेणे अनिवार्य असेल. हवाई प्रवासासाठी कोरोनाच्या दोन्ही डोससोबत काेराेनाचे निगेटिव्ह प्रमाणपत्रही गरजेचे असेल. फायझर-माॅर्डनाचे दोन डोस, जे अँड जेचा सिंगल डोस अपेक्षित आहे.

बातम्या आणखी आहेत...