आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • US Capital Violence Death Toll Update | Donald Trump Supporters Protest, Washington DC Violence And Joe Biden Elections News And Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

206 वर्षानंतर अमेरिकन संसदेत हिंसा:जो बायडेन यांच्या विजयावर काँग्रेसचा शिक्कामोर्तब; डोनाल्ड ट्रम्प यांनी पराभव स्विकारला, शेवटचा रडीचा डाव सुद्धा ठरला फेल

वॉशिंग्टन3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मतमोजणीवेळी ट्रम्प समर्थकांचा गोंधळ, संसदेत गोळीबार, 4 जणांचा मृत्यू

अमेरिकेत हिंसेदरम्यान काँग्रेसने प्रेसिडेंट इलेक्ट जो बायडेन यांच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. यूएस काँग्रेसच्या जॉइंट सेशनमध्ये वाइस प्रेसिडेंट इलेक्ट कमला हॅरिस यांच्याही विजयाला मंजुरी देण्यात आली. काँग्रेसच्या मंजुरीनंतर बायडेन अधिकृतरित्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि कमला हॅरिस उपराष्ट्राध्यक्ष झाले आहेत. या निर्णयानंतर मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपला पराभव स्विकार केला आहे. ते म्हणाले की, 20 जानेवारीला कायद्यानुसार, जो बायडन यांना सत्ता स्वाधीन करेन.

मतमोजणीवेळी ट्रम्प समर्थकांचा गोंधळ, संसदेत गोळीबार, 4 जणांचा मृत्यू

अमेरिकेत राष्ट्रपती निवडणुकीनंतर ज्याची भीती होती तेच घडले. बुधवारी येथे बुधवारी जो बिडेन यांच्या विजयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी संसदेचे दोन्ही सभागृह एकत्र आले. मतमोजणी दरम्यान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे शेकडो समर्थक संसद भवन (कॅपिटल हिल) मध्ये घुसले. यावेळी गोळीबार देखील झाला आणि एका महिलेचा मृत्यू झाला, तर हिंसाचारात आतापर्यंत चार जणांचा जीव गेला आहे.

कॅपिटल हिलमध्ये हिंसा

बुधवारी इलेक्ट्रॉल कॉलेजच्या मतांची मोजणी आणि बायडेन यांच्या विजयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी संसदेच्या दोन्ही सभागृह सीनेट आणि HOR ची बैठक सुरु झाली. यादरम्यान ट्रम्प आणि रिपब्लिकन पार्टीचे शेकडो समर्थक संसदेच्या बाहेर जमा झाले. नॅशनल गार्ड्स आणि पोलिस त्यांना समजावून सांगण्यापूर्वी काही लोक आत शिरले. मोठ्या प्रमाणात तोड़फोड आणि हिंसा झाली.

206 वर्षानंतर अमेरिकन संसदेत हिंसा

यूएस कॅपिटल हिस्टोरिकल सोसायटीचे डायरेक्टर सॅम्युअल हॉलिडेने सीएनएनला सांगितले की, 24 ऑगस्ट 1814 मध्ये ब्रिटनने अमेरिकेवर हल्ला चढवला होता. अमेरिकन सैन्याच्या पराभवानंतर ब्रिटिश सैनिकांनी यूएस कॅपिटलमध्ये आग लावली होती. तेव्हापासून आतापर्यंत मागील 206 वर्षात अमेरिकन संसदेवर असा हल्ला झाला नाही.

अमेरिकन संसदेत गोळीबार

न्यूयॉर्क टाइम्सने एक फोटो द्वारे सांगितले की, जेव्हा ट्रम्प समर्थक संसदेत गोंधळ घालत होते, तेव्हा काही पोलिस अधिकाऱ्यांना दंगलखोरांवर बंदूक धरली. यात एका महिलेचा मृत्यू झाला. मात्र या महिलेचा मृत्यू पोलिसांच्या गोळीने झाला की, दुसरीकडून कोणी गोळी झाडली हे अद्याप समजले नाही.

लष्कराचे विशेष रक्षक तैनात

या घटनेनंतर डीसी मधील अमेरिकन सैन्याच्या विशेष तुकडीला पाचारण करण्यात आले. मात्र 20 मिनिटात त्यांन मोर्चा सांभाळला. कॅपिटल हिलच्या बाहेर आणि आत एकूणच 1100 विशेष गार्ड तैनात असून संचारबंदी लागू आहे.

ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्रामने डोनाल्ड ट्रम्प यांचे अकाउंट केले ब्लॉक

अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्ष निवडणुकांच्या निकालापूर्वी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांमधील हिंसेदरम्यान ट्विटर, फेसबुकने ट्रम्प यांचे अकाउंट ब्लॉक केले आहे. ट्विटरने इशारा दिला आहे की, ट्रम्प यांनी भविष्यात नियम मोडल्यास त्यांचे अकाउंट नेहमीसाठी बंद केले जाऊ शकते.

ट्रम्प यांनी व्हिडिओमध्ये म्हटले होते - निवडणुकीत धोका झाला

कॅपिटल हिलमध्ये हिंसेनंतर ट्रम्प यांनी ट्विटरवर 1 मिनिटाचा व्हिडिओ पोस्ट केला होता. ज्यामध्ये ते आपल्या समर्थकांना म्हणत होते - मला माहिती आहे तुम्ही दुःखी आहात. आपल्याकडून निवडणूक हिसकावून घेण्यात आली. यावेळी निवडणुकीत धोका झाला. मात्र आपण त्या लोकांच्या हातात खेळू शकत नाही. आपल्याला शांतता ठेवायची आहे. तुम्ही घरी परता.

बातम्या आणखी आहेत...