आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संसद हिंसाचारासाठी ट्रम्प जबाबदार:चौकशी समितीने केली गुन्हेगारी खटल्याची शिफारस; ट्रम्प म्हणाले- माझ्यावरील आरोप खोटे

वॉशिंग्टन2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणी वाढल्या आहेत. अमेरिकेच्या कॅपिटल हिलवर (अमेरिकेची संसद) 6 जानेवारी 2012 रोजी झालेल्या हिंसाचार प्रकरणी चौकशी समितीने ट्रम्प यांना दोषी ठरवले आहे. सोमवारी आपल्या 154 पानांच्या अहवालात, पॅनेलने ट्रम्प यांच्यावर फौजदारी खटला चालवण्याची शिफारस केली.

दुसरीकडे ट्रम्प यांनी स्वतःवरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. ट्रूथ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे - माझ्यावरील सर्व आरोप खोटे आहेत. चौकशी समितीमार्फत चौकशी सुरू असलेल्या या प्रकरणावर यापूर्वीच महाभियोगाच्या स्वरुपात कारवाई करण्यात आली आहे. पुन्हा एकदा तेच आरोप करणे म्हणजे मला आणि रिपब्लिकन पक्षाला बाजूला करण्याचा कट आहे.

बंडखोरी, सरकारची फसवणूक केल्याचा आरोप

तपास समितीच्या म्हणण्यानुसार, 6 जानेवारी 2021 रोजी कॅपिटल हिलमध्ये झालेला हिंसाचार हा अपघात नव्हता, तर एक कट होता.
तपास समितीच्या म्हणण्यानुसार, 6 जानेवारी 2021 रोजी कॅपिटल हिलमध्ये झालेला हिंसाचार हा अपघात नव्हता, तर एक कट होता.

न्यूज एजन्सी एएफपीच्या वृत्तानुसार, काँग्रेसच्या समितीने ट्रम्प यांच्यावर बंडखोरी भडकवणे, अधिकृत कारवाईत अडथळा आणणे, कट रचणे, खोटी विधाने करणे आणि सरकारची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. यासोबतच 2020 च्या अध्यक्षीय निवडणुकीतील पराभवाचा निर्णय उलटवणे, करसंबंधित बाबी लपवणे आणि व्हाईट हाऊसमधून गुप्त कागदपत्रे घेऊन जाणे या प्रकरणांचीही चौकशी केली जात आहे.

18 महिन्यांपूर्वी ही समिती स्थापन करण्यात आली होती. ट्रम्प यांच्याशिवाय त्यांच्या 5 सहकाऱ्यांवरील आरोपांचीही चौकशी केली जात आहे. कॅपिटलवर हिंसाचार भडकवण्याचा कट रचल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे. या समितीमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाचे 7 खासदार आणि रिपब्लिकन पक्षाचे 2 खासदार आहेत. त्याचे अध्यक्ष बेनी थॉम्पसन आहेत.

ट्रम्प यांच्याविरोधातील सुनावणीचे ठळक मुद्दे

  • हिंसाचार सुरू झाल्यानंतर 187 मिनिटांपर्यंत ट्रम्प जेवणाच्या खोलीत बसून टीव्हीवर हिंसा पाहत होते.
  • ट्रम्प कोणाचेही ऐकायला तयार नव्हते. हिंसाचार थांबवण्यासाठी आणि लोकांना परत पाठवण्यासाठी पावले उचलण्यास त्यांना अनेक वेळा सांगण्यात आले.
  • ट्रम्प यांनी कायदा अंमलबजावणी प्रमुखांना किंवा राष्ट्रीय सुरक्षा विभागाच्या प्रमुखांना हिंसाचार रोखण्यासाठी मदत मागितली नाही.
कॅपिटल हिलमध्ये ट्रम्प यांनी दंगल घडवून आणल्याचे समितीचे म्हणणे आहे.
कॅपिटल हिलमध्ये ट्रम्प यांनी दंगल घडवून आणल्याचे समितीचे म्हणणे आहे.
  • निवडणूक संपली आणि त्यांचा पराभव झाला हे मान्य करायला ट्रम्प तयार नव्हते. हिंसाचाराच्या एका दिवसानंतर समोर आलेल्या व्हिडिओमध्ये त्यांनी याचा उल्लेख केला आहे.
  • जमावाने कायदा मोडल्याचे सांगण्यासही ट्रम्प यांनी नकार दिला. त्यांनी जमावाचे वर्णन देशभक्त असे केले. त्यांनी जनतेला हा दिवस नेहमी लक्षात ठेवण्यास सांगितले. याबाबत ट्रम्प यांना कोणतीही खंत नाही.
  • 6 जानेवारी 2021 रोजी कॅपिटल हिलवर झालेला हिंसाचार अपघाती नव्हता. ट्रम्प यांची ही शेवटची भूमिका होती. ट्रम्प यांनी दंगली घडवून आणण्याचा प्रयत्न केला.
  • व्हाईट हाऊसचे माजी वकील पॅट सिपोलोन यांच्या साक्षीच्या आधारे, समितीने हे मान्य केले की व्हाईट हाऊसमधील कोणीही हिंसाचाराचा निषेध केला नाही.

6 जानेवारी 2021 रोजी कॅपिटल हिलमध्ये काय घडले?

या हिंसाचारात पाच जणांचा मृत्यू झाला होता, तर 100 हून अधिक जण जखमी झाले होते.
या हिंसाचारात पाच जणांचा मृत्यू झाला होता, तर 100 हून अधिक जण जखमी झाले होते.

या दिवशी ट्रम्प यांच्या समर्थकांनी अमेरिकन संसदेत प्रवेश केला. त्यांनी हिंसाचार भडकावला, ज्यामध्ये 5 लोक मरण पावले आणि 100 हून अधिक जखमी झाले. ट्रम्प यांनी ट्विटमध्ये या समर्थकांचे क्रांतिकारक असे वर्णनही केले होते. 2020 च्या अध्यक्षीय निवडणुकीचा निकाल बदलण्यासाठी हे सर्व घडले, ज्यामध्ये जो बायडेन विजयी झाले होते.

बातम्या आणखी आहेत...