आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमेरिकन संसदेचे कनिष्ठ सभागृह (भारतातील लोकसभेप्रमाणे) हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी तैवानची राजधानी तैपेई येथे पोहोचल्या आहेत. यूएस नेव्ही आणि एअर फोर्सच्या 24 प्रगत लढाऊ विमानांनी नॅन्सी यांच्या विमानाला एस्कॉर्ट केले.
दुसरीकडे, चीनने तैवान सीमेजवळ लष्करी कवायती केली असून, अमेरिकेला अत्यंत गंभीर परिणाम भोगावे लागण्याची धमकी दिली आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अमेरिका, तैवान आणि चीन या तिन्ही देशांनी आपापल्या सैन्याला युद्धासाठी सज्ज राहण्यास सांगितले आहे. मंगळवारी संध्याकाळी उशिरा या तिघांनीही सैन्यासाठी हाय अलर्ट जारी केला.
चीन काय करू शकतो
'साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट'च्या वृत्तानुसार, सुरुवातीला काहीसा संकोच दाखवल्यानंतर आता जो बायडेन प्रशासनाने चीनशी थेट दोन हात करण्याची तयारी केली आहे. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी (PLA) च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जर पेलोसी यांचे विमान तैवानच्या दिशेने गेले तर चिनी हवाई दलाचा ताफा त्याला घेरेल. तेच झालं. परंतु पेलोसीचे विमान रोखण्याचे धाडस चीन करू शकला नाही.
काही तज्ञांच्या मते, चीनने फक्त धमकी दिली होती. तो असे काहीही करणार नाही ज्यामुळे अमेरिकेशी थेट सामना होईल. याचे कारण म्हणजे आता अमेरिकाही या क्षेत्रात बलाढ्य बनली आहे.
तैवान आणि अमेरिकाही सज्ज
वृत्तानुसार, अमेरिका आणि तैवानच्या सैन्याने चीनशी सामना करण्याची तयारी केली आहे. अमेरिकेच्या नौदलाच्या चार युद्धनौका हाय अलर्टवर असून तैवानच्या सागरी सीमेवर गस्त घालत आहेत. त्यांच्याकडे F-16 आणि F-35 सारखी अत्यंत प्रगत लढाऊ विमाने आणि क्षेपणास्त्रे आहेत. रीपर ड्रोन आणि लेझर गाईडेड मिसाईल्सही तयार आहेत. चीनने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यास अमेरिका आणि तैवान दोन्ही बाजूंनी हल्ला करू शकतात.
चीनने लांब पल्ल्याच्या हुडोंग रॉकेट आणि रणगाडे कारवाईसाठी सज्ज ठेवल्याचे बोलले जात आहे. तैवान सामुद्रधुनीमध्ये इतर लष्करी प्रतिष्ठान देखील आहेत. तो त्यांचा वापर करू शकतो. अमेरिकन सैन्य या कृत्यांवर बारीक नजर ठेवून आहे. यूएसएस रोनाल्ड रीगन युद्धनौका आणि असॉल्ट शिप हाय अलर्टवर आहेत.
अमेरिकन सैनिक तैवानमध्ये?
पेलोसीच्या भेटीपूर्वी अनेक अमेरिकन सैनिक आणि लष्करी तांत्रिक तज्ज्ञ तैवानला पोहोचले असल्याचा दावा काही मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. लष्करी परिभाषेत याला बूट ऑन ग्राउंड म्हणतात. किंबहुना, दक्षिण चीन समुद्र किंवा तैवान सामुद्रधुनीत चीनच्या कट्टरतेला आळा घालावा लागेल, असे अमेरिकेने आता ठरवले आहे.
तैवानमध्ये आपले सैन्य आहे की नाही हे अमेरिकेने अद्याप स्पष्ट केलेले नाही. गेल्या आठवड्यात पेंटागॉनच्या प्रवक्त्याला याबाबत विचारणा केली असता त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.