आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅपिटल हिल हिंसाचार:अमेरिकी काँग्रेसचा रिपोर्ट, ट्रम्प हिंसाचारातील जबाबदार, साक्षीदारांना नोकरीची लालूच

न्यूयॉर्क / मोहंमद अलीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणी वाढल्या आहेत. कॅपिटल हिल हिंसाचाराची चौकशी करणाऱ्या काँग्रेस कमिटीने ट्रम्प यांना यासाठी जबाबदार धरले आहे. हा हिंसाचार ६ जानेवारी २०२१ रोजी अमेरिकेत राष्ट्राध्यक्षाच्या शपथविधीआधी झाला होता. ट्रम्प यांचे हजारो समर्थक संसद भवनात घुसले होते. या कमिटीने सोमवारी आपल्या १५४ पानी अहवालात ट्रम्प यंाच्याविरुद्ध गुन्हेगारी खटला चालवण्याची शिफारस केली आहे. यासाठी १००० प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवले होते.

काँग्रेस समितीने ट्रम्प यांच्यावर हिंसाचार भडकवणे, अधिकृत कामात अडथळा आणणे, अमेरिकी सरकारला धोका देणे, कट रचणे आणि खोटे वक्तव्य दिल्याचा आरोप केला आहे. मात्र, याचा निर्णय न्याय विभाग घेईल की, ट्रम्प यांना दोषी ठरवत त्यांच्याविरुद्ध राजद्रोहाचा खटला चालवावा की नाही. न्याय विभागातील अनेक माजी आणि विद्यमान अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, चौकशीत ट्रम्प यांच्याविरुद्ध अनेक पुरावे सापडले आहेत, ज्याच्या आधारे त्यांच्यावर खटला चालू शकतो. यात खोटी साक्ष आणि वक्तव्याचाही उल्लेख आहे. न्याय विभागातील एका अधिकाऱ्याने भास्करला सांगितले की, साक्ष फिरवण्यासाठी ट्रम्पच्या वकिलांनी साक्षीदारांना नोकरीपर्यंतचे आमिष दाखवल्याचे पुरावे मिळाले आहेत. अहवालात याचा उल्लेख करण्यात आला आहे.

ट्रम्पनी आरोप फेटाळले; मात्र, स्वपक्षीय विरोधात
ट्रम्प यांनी स्वत:वर लावलेले आरोप खोटे ठरवले आहेत. ते म्हणाले, तेच ते आरोप करून मला आणि रिपब्लिकन पक्षाला साइडलाइन करण्याचा कट आहे. इकडे, रिपब्लिकन सिनेटर सिंथिया लुमिन्स म्हणाले, ट्रम्पनी २०२४ च्या निवडणुकीसाठी प्रचार मोहीम सुरू केली होती, आता ते संपले आहेत. त्यांनी मोठ्या प्रमाणात फसवणूक केल्यामुळे मागील निवडणूक हरले होते. मला वाटते लोक आता पक्षात ट्रम्प यांच्याशिवाय अन्य पर्याय शोधत आहेत. अन्य एक सिनेटर माइक राउंड्स म्हणाले, निवडणूक जिंकण्यासाठी केवळ कट्टरपंथी मते पुरेशी नाहीत. यामध्ये अपक्ष मतांचीही आवश्यकता भासणार आहे.

ट्रम्प यांच्यावरील आरोप सिद्ध झाल्यास ३६ वर्षे तुरुंगवासाची शिक्षा शक्य
1. अधिकृत कामकाजात अडथळा आणण्यासाठी २० वर्षे तुरुंगवास आणि १ लाख डॉलर दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे.
2. देशाविरुद्ध कट रचण्याच्या प्रकरणात ५ वर्षोच्या शिक्षेची तरतूद आहे.
3. खोट्या वक्तव्यात १ वर्षापेक्षा जास्त शिक्षा होऊ शकते.
4. बंड केल्याबद्दल १० वर्षे शिक्षा आणि पुढे निवडणूक बंदीची तरतूद आहे.
* या प्रकरणात चारही आरोप सिद्ध झाल्यास ट्रम्प यांना सुमारे ३६ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.

बातम्या आणखी आहेत...