आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विषाणू बाधेचा कहर:अमेरिकेमध्ये काेराेनामुळे एका दिवसात 3260 मृत्यूचा विक्रम, 2.26 लाख नवे रुग्ण समाेर

न्यूयाॅर्कएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
सिंगापूर : क्रूझवर प्रवाशाच्या काेराेनाबाधेचे वृत्त चुकीचे - Divya Marathi
सिंगापूर : क्रूझवर प्रवाशाच्या काेराेनाबाधेचे वृत्त चुकीचे
  • दक्षिण आफ्रिकेत कोरोना संसर्गाची दुसरी लाट, लॉकडाऊन शक्य

काेराेना महामारीचा सर्वाधिक फटका बसलेल्या अमेरिकेत बुधवारी संसर्गामुळे हाेणाऱ्या मृत्यूंचा विक्रम पुन्हा माेडला गेला. बुधवारी महामारीमुळे एकाच दिवसात ३ हजार २६० जणांचा मृत्यू झाला. २ लाख २६ हजार ७६२ नवे विक्रम समाेर आले.याआधी अमेरिकेत काेराेनामुळे एका दिवसात सर्वाधिक मृत्यूंचा विक्रम १५ एप्रिल राेजी नाेंदवण्यात आला हाेता. तेव्हा एका दिवसात २ हजार ७५२ जणांचा मृत्यू झाला हाेता. जवळपास संपूर्ण अमेरिकेत काेराेनामुळे संबंधित मृत्यूंची संख्या वाढली. सात दिवसांतील सरासरी मृत्यू २ हजार २४९ नाेंदवण्यात आले. हादेखील विक्रम आहे. मागील विक्रम १७ एप्रिलला नाेंदवण्यात आला हाेता. तेव्हा सात दिवसांतील मृत्यूंची सरासरी २ हजार २३२ हाेती. दैनंदिन आकड्याच्या तुलनेत सात दिवसांतील स्थिती पाहिल्यास वास्तव नेमकेपणाने समाेर येते, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. ब्रिटनमध्ये फायझरच्या लसीचा उपयाेग सुरू झाला आहे. कंपनीने अमेरिकेतही अर्ज दाखल केला आहे. येथे प्रशासन आपत्कालीन वापराच्या परवानगीवर विचार करत आहे. थँक्स गिव्हिंग डेनिमित्त अमेरिकेतील माेठ्या लाेकसंख्येने एका शहरातून दुसऱ्या शहरात प्रवास केला.

सिंगापूर : क्रूझवर प्रवाशाच्या काेराेनाबाधेचे वृत्त चुकीचे
काेराेना महामारीमुळे क्रूझ उद्याेगाला माेठा झटका बसला आहे. त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करणाऱ्या सिंगापूरचे राॅयल कॅरेबियन शिप १७०० प्रवाशांसह प्रवासावर निघाले हाेते. परंतु प्रवासादरम्यान क्रूझवरील एक व्यक्ती बाधित असल्याचे वृत्त आले. त्यानंतर सर्व प्रवाशांना क्वाॅरंटाइन करण्यात आले. क्रूझला पुन्हा सिंगापूरच्या दिशेने वळवण्यात आले. मात्र आता त्या व्यक्तीला काेराेना नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे सर्व प्रवाशांना क्वाॅरंटाइनमुक्त करण्यात आले आहे.

दक्षिण आफ्रिकेत कोरोना संसर्गाची दुसरी लाट, लॉकडाऊन शक्य
दक्षिण आफ्रिकेतील सरकारने देशात कोरोना महामारीची दुसरी लाट आल्याचे जाहीर केले आहे. वेस्टर्न केप, ईस्टर्न केप, क्वाझुलु-नटाल व गुटेंगमध्ये बाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे. बुधवारी दक्षिण आफ्रिकेत ६ हजार ७०९ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे येथील एकूण बाधितांची संख्या ८,२८,५९८ झाली आहे. आतापर्यंत २२ हजार ५७४ लोकांनी प्राण गमावले. मार्चमध्ये कोरोनाची पहिली लाट आल्यानंतर दक्षिण आफ्रिकेने अतिशय कडक लॉकडाऊन लागू केला होता. आता पुन्हा कडक लॉकडाऊन लागू केला जाऊ शकतो.

१५ एप्रिलचा विक्रम माेडला, तेव्हा २ हजार ७५२ जणांचा मृत्यू
युराेप : रशिया व जर्मनी वगळता बहुतांश देशांत मंदी

युराेपातील बहुतांश देशांत आता काेराेनाच्या रुग्णांत घट झाली आहे. रशिया व जर्मनीमधील स्थिती सुधारू लागली आहे. रशियात बुधवारी २६ हजार १९० नवे रुग्ण समाेर आले आहेत. येथे २५ नाेव्हेंबरनंतर सातत्याने दरराेज २५ हजारांहून जास्त प्रकरणे समाेर आली आहेत. जर्मनीत बुधवारी २३ हजार ९२८ रुग्ण समाेर आले. १३ नाेव्हेंबरला ४० हजारांहून जास्त नवे रुग्ण समाेर आले. इटलीत ९ डिसेंबरला १२ हजार ७५६ रुग्ण समाेर आले. लसीकरणाची सुरुवात झालेल्या ब्रिटनमध्ये १६ हजार ५७८ नवे रुग्ण समाेर आले.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser