आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमेरिका कोरोना:अमेरिकेत 2 कोटी लोकांना फटका शक्य : सीडीसी, सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्णांत वाढ

वॉशिंग्टनएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना संसर्गाच्या रुग्णांत सातत्याने वाढ होत असल्याने बाधितांची संख्या दोन कोटींहून जास्त हाेऊ शकते, असे अमेरिकेतील सेंटर फॉर डिसिज कंट्रोल या संस्थेला वाटते. अमेरिकेत समोर आलेल्या कोरोनाच्या २४ लाख रुग्णांच्या तुलनेत हा आकडा दहापटीने जास्त आहे. देशात कोरोनाचा कहर वाढत चाललाा आहे. येथे एका दिवसात सर्वाधिक ४१ हजार नवे रुग्ण आढळून आले. ही संख्या आतापर्यंत विक्रमी ठरली. त्याशिवाय एकाच दिवसात देशात २ हजार ४३० जणांचा मृत्यू झाला. अमेरिकेच्या जॉन हापकिन्स विद्यापीठाच्या म्हणण्यानुसार अमेरिकेत आतापर्यंत २४ लाखांहून जास्त लोक बाधित आहेत, तर १ लाख २४ हजार ४१० जणांचा मृत्यू झाला.

त्याच्या एक दिवस आधी ३७ हजार ७७ कोरोना रुग्ण आढळून आले होते. अमेरिकेतील प्रत्येक राज्यातून कोरोनाचे नवे रुग्ण वाढू लागले आहेत. न्यूजर्सीमध्ये एका दिववसात सर्वाधिक मृत्यूची प्रकरणे समोर आली. न्यूयॉर्क व कॅलिफोर्नियात सातत्याने वाढ होत आहे. फ्लोरिडा, टेक्सासमध्ये ५ हजारांहून जास्त रुग्ण आढळले. कॅलिफॉर्नियात ७ हजार नवे रुग्णे बाधित आहेत. न्यूयॉर्कमध्ये आतापर्यंत ३१ हजार ३०१ जणांचा मृत्यू झाला. न्यूजर्सीमध्ये आतापर्यंत १४ हजार ८७२ जणांनी प्राण गमावले.

अनेक राज्यांनी अनलॉक थांबवले : कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचे पाहून टेक्साससह अनेक राज्यांनी अनलॉकचा पुढचा फेज टाळण्याचा निर्णय घेतला आहे.

बातम्या आणखी आहेत...