आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कारभारावर टीका केल्याने एका वैज्ञानिकाला आपले पद गमवावे लागले आहे. अमेरिकन वैज्ञानिकाने दावा केला होता, की भारताकडून येणाऱ्या मलेरिया आणि प्रामुख्याने हायड्रोक्सीक्लोरोक्वीनच्या औषधी हलक्या दर्जाच्या आहेत. वारंवार सूचना देऊनही ट्रम्प प्रशासनातील अधिकाऱ्यांनी यावर दुर्लक्ष केले. डॉ. रिक ब्राइट असे या वैज्ञानिकाचे नाव असून त्यांनी हा मुद्दा अमेरिकेच्या विशेष काउंसिल ऑफिसमध्ये उपस्थित केला होता. त्यांनी पीपीई किटवर सुद्धा तक्रार दिली होती. परंतु, संबंधित अधिकाऱ्यांवर काही कारवाई करणे सोडून ट्रम्प प्रशासनाने वैज्ञानिक ब्रिक यांचीच हकालपट्टी केली. ब्रिक हे बायोमेडिकल अॅडव्हांस्ड रिसर्च डेव्हलपमेंट अथॉरिटीचे प्रमुख होते. ही अमेरिकेतील आरोग्य विषय काम करणारी एजंसी आहे.
औषधी पाठवणाऱ्या कंपन्यांचे निरीक्षण झालेच नाही
ब्राइट यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, फेडरल ड्रग असोसिएशन (एफडीए) ने भारताच्या औषध निर्मिती कंपन्यांचे निरीक्षणच केले नाही. अशात तेथे तयार होणाऱ्या औषधींची गुणवत्ता चिंतेचा विषय आहे. अशा कंपन्यांमध्ये औषधी संक्रमित सुद्धा असू शकतात. यात मुबलक प्रमाणात डोस आहे की नाही याची सुद्धा शाश्वती नाही. गुणवत्ता नसलेल्या औषधी अमेरिकेला दिल्या जात असतील तर ही एक गंभीर बाब आहे. ट्रम्प प्रशासनातील आरोग्य अधिकाऱ्यांना याची कल्पना होती. तरीही त्यांनी दुर्लक्ष करून बाजारात अशा औषधी वितरीत केल्या आहेत.
भारताने अमेरिकेला दिल्या हायड्रोक्सीक्लोरोक्वीन
कोरोनाच्या वाढत्या संक्रमणात भारतामध्ये हायड्रोक्सीक्लोरोक्वीन या औषधी रुग्णांवर काम करत असल्याचे दिसून आले. अमेरिका किंवा इतर देशांमध्ये त्याचे उत्पादन होत नाही. सोबतच, या औषधींचे निर्यात करण्याचे नियम सुद्धा कडक होते. परंतु, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरुवातीला आग्रह करून त्यानंतर इशारा देऊन भारताकडून मोठ्या प्रमाणात या औषधी मागवण्यास सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या औषधींवरील निर्यात बंदी हटवल्यानंतर अमेरिकेसह अनेक देशांना त्या पाठवल्या आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.