आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • US Covid 19 Virus Pills | US To Spent More Than $3 Billion To Developing Pills To Fight The Covid 19 Virus; News And Live Updates

महामारीविरूद्ध आणखी एक पाऊल:अमेरिका लसीनंतर आता कोविड-19 च्या टॅबलेट तयार करणार; विकास आणि संशोधनासाठी 3 अब्ज डॉलर्सचे फंड

न्यूयॉर्क4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अँटीवायरल गोळ्याद्वारे कोविड -19 च्या रूग्णांवर उपचार करता येईल अशी वेळ लवकर येवो - डॉक्टर फौसी

अमेरिकन सरकारने कोरोनावर लस तयार करण्यासाठी लस उत्पादक कंपन्यांना 18 अब्ज डॉलर्स दिले होते. आता अमेरिकाजवळ 5 लसी असून त्यांना रेकॉर्ड टाईममध्ये तयार करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर बायडेन सरकार आता कोविड 19 च्या टॅबेलट बनवण्याची तयारी करत असून यासाठी 3 अब्ज डॉलर्सची मदत जाहीर केली आहे. या गोळ्या सुरुवातीलाच कोरोनाच्या विषाणूला नष्ट करणार आहे. यामुळे लाखो लोकांचे जीव वाचणार आहे.

लवकरच सुरु होणार चाचणी
‘न्यूयॉर्क टाइम्स’च्या माहितीनुसार, अमेरिकन आरोग्य व मानव सेवा विभागाने (DHHS) कोविड - 19 पिल्स प्रोग्राम जाहीर केला आहे. दरम्यान, यासाठी काही कंपन्यांनी पुढाकार घेतला असून ट्रायल्स लवकरात लवकर घेण्याचे काम सुरु केले आहे. जर सर्व काही ठीक झाले तर या वर्षाच्या अखेरीस काही गोळ्या बाजारात येतील असा दावा डीएचएचएसने केला आहे. या अभियानात केवळ कोरोनावरच नव्हे तर भविष्यातील संभाव्य रोगांवरील औषधांसाठी काम केले जाणार आहे. त्यासाठी अँटी व्हायरल प्रोग्राम फॉर पेन्डॅमिक चालवला जात आहे.

इतर विषाणूंवरील उपचार शोधणार
अहवालानुसार, इन्फ्लूएन्झा, एचआयव्ही आणि हिपॅटायटीस सारख्या जीवघेण्या आजारांवरील औषधे किंवा गोळ‌्या तयार केल्या जातील. यावर आधीपासूनच संशोधन सुरु होते. परंतु, कोरोना येण्यापूर्वी इतर रोगांच्या गोळ्या तयार करण्यात यश मिळू शकले नाही. त्यामुळे हे काम आता मिशन मोडवर सुरु करण्यात आले आहे.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अॅलर्जी अ‍ॅन्ड इन्फेक्टीव्ह डिसिसीजचे संचालक अँथनी फौसी म्हणाले की, अँटीवायरल गोळ्याद्वारे कोविड -19 च्या रूग्णांवर उपचार करता येईल अशी वेळ लवकर येवो. डॉक्टर फौसी पुढे म्हणाले की, एके दिवशी सकाळी मी उठतो. मला वाटते की मला बरे वाटत नाही. गंधक शक्ती आणि चव चालल्या जाते. घशातही वेदना होतात. मग मी माझ्या डॉक्टरांना कॉल करतो आणि म्हणतो - मला कोविड आहे आणि मला औषध सांगा.

अँटीव्हायरल औषधामुळे फायदे झाले नाही
कोविड - 19 च्या सुरुवातीच्या काळात संशोधकांनी काही अँटीव्हायरल औषधांचा वापर केला. परंतु, त्यामुळे गंभीर रुग्णांवर चांगले परिणाम पाहायला मिळाले नाहीत. संशोधकांच्या मते, हे औषधे कोरोनाच्या पहिल्या काही दिवसांत वापरले असते तर फायदेशीर ठरले असते. परंतु, यामध्ये फक्त रेमडेसिवीर काही प्रमाणात यशस्वी झाले आहे. परंतु, त्याचा उपयोगदेखील डॉक्टरांच्या देखरेखीखाली करणे गरजेचे आहे. नोव्हेंबरमध्ये डब्ल्यूएचओने त्याच्या वापराबाबत खबरदारी घेण्यास सांगितले होते.

बातम्या आणखी आहेत...