आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमेरिकेच्या मोंटाना शहरात चीनचा संशयास्पद हेर बलून दिसला आहे. मोंटानामध्ये अमेरिकन हवाईदलाचा स्पेशल बेस आहे. तेथून आंतरखंडीय क्षेपणास्त्रांचे संचलन केले जाते. संपूर्ण अमेरिकेत असे 3 हवाईतळ आहेत. अमेरिकन संरक्षण मंत्रालय पेंटागॉनचे प्रेस सचिव पॅट रायडर म्हणाले की, चीनचा हेर बलून नॉर्थ वेस्टर्न सिटी मोंटानात दिसून आला. हा बलून अमेरिकेच्या हेरगिरीसाठी पाठवण्यात आला होता.
हा बलून किती उंचीवर उडत होता, हे अधिकाऱ्यांनी सांगितले नाही. पण तो सिव्हिलियन एअर ट्रॅफिकच्या वर व आउटर स्पेसच्या खाली उडत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विशेष बाब म्हणजे अमेरिकन परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन यांच्या चीन दौऱ्याच्या 1 दिवस अगोदर हा बलून दिसून आला आहे. ब्लिंकन 5 व 6 फेब्रुवारी रोजी चीनच्या दौऱ्यावर जाणार आहेत.
चीनने मोबाइल टॉवरवर डिव्हाइस लावून हेरगिरी केली
चीनने मोबाइल टॉवरवर हुवावेचे हेरगिरी डिव्हाइस लावण्याचा कट रचला होता. त्यामाध्यमातून मिटवेस्टच्या लष्करी ठिकाणांची हेरगिरी करण्यात येत होती. हे डिव्हाइस ओबामांच्या काळात लावण्यास सुरुवात झाली होती.
चीनने अमेरिकेच्या ग्रामीण भागांना लक्ष्य करत तिथे आपले डिव्हाइस लावले होते. तेथून ते लष्करी ठिकाणांकडे लावण्यात येत असताना गुप्तहेर संघटनांना त्याचा संशय आला. त्यानंतर त्यावर तत्काळ कारवाई करण्यात आली. अमेरिकन संसदेने ग्रामीण भागातून ही उपकरणे काढून टाकण्यासाठी 2020 मध्ये 15 हजार रुपये मंजूर केले होते.
कॅनडामार्गे अमेरिकेत आला बलून
पेंटागॉनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, हा बलून काही दिवसांपूर्वी चीनहून अलास्कालगतच्या अलेउतियन आयलँडवर आला होता. तेथून नॉर्थ वेस्ट कॅनडामार्गे तो मोंटाना शहरात पोहोचला.
बलूनपासून कोणताही धोका नाही
संरक्षण मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, हा बलून प्रदिर्घ काळ देशात राहू शकतो. पण त्यापासून लष्करी किंवा शारीरिकि प्रकारचा कोणताही धोका नाही. त्याचा एक्सेसही मर्यादित आहे. त्यामुळे त्यापासून गोपनीय माहिती गोळा करण्याचीही फारशी शक्यता नाही. दुसरीकडे, अन्य एका अधिकाऱ्याने सांगितले की, चीनला सॅटेलाइट इमेजरीच्या माध्यमातून जे काही मिळवता येईल, त्या तुलनेत या बलूनमधून काहीच मिळवता येणार नाही.
अमेरिकेने बलून नष्ट केला नाही
पेंटागॉनचा एक अधिकारी म्हणाला - बलून सिव्हिलियन एअर ट्रॅफिकच्यावर आहे. त्यामुळे आम्ही तूर्त तो नष्ट करण्याचा किंवा तो खाली पाडण्याचा निर्णय घेतला नाही. असे केल्यास नागरिकांना नुकसान पोहोचण्याची भीती आहे.
अमेरिकन परराष्ट्र मंत्री चिनी अध्यक्षांची भेट घेणार
न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार, परराष्ट्र मंत्री ब्लिंकन यांच्या दौऱ्यापूर्वी ही बातमी सार्वजनिक करण्यात आली आहे. अमेरिकेचा हा निर्णय चीनसाठी इशारा असल्याचे मानले जात आहे. 6 वर्षांत प्रथमच अमेरिकन परराष्ट्र मंत्री चीनच्या दौऱ्यावर जात आहेत. ब्लिंकन आपल्या दौऱ्यात चिनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचीही भेट घेऊ शकतात.
पॅगोडाद्वारे हेरगिरीचा प्रयत्न
चीनने अमेरिकेची हेरगिरी केल्याचा हा पहिलाच प्रयत्न नाही. यापूर्वी चीनने व्हाइट हाऊसलगत एक उद्यान विकसित करून तेथे पॅगोटा बांधण्याचा प्रयत्न केला होता. या पॅगोडाच्या माध्यमातून त्याने हेरगिरी करण्याचा प्रयत्न केला होता. हा पॅगोडा व्हाइट हाऊससह अन्य सरकारी इमारतींपासून अवघ्या 8 किमी अंतरावर होता. दूरवरपर्यंत नजर ठेवता येईल एवढी त्याची उंची होती. पण अमेरिकन गुप्तहेर यंत्रणा FBIने वेळीच हे बांधकाम रोखले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.