आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • US Election 2020 Biden On The Threshold Of The White House, While Donald Trump Climbed The Court Steps!

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमेरिकी राष्ट्राध्यक्ष निवडणूक 2020:बायडेन व्हाइट हाऊसच्या उंबरठ्यावर, तर डाेनाल्ड ट्रम्प चढले कोर्टाची पायरी!

न्यूयॉर्कएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोर्टाच्या माध्यमातून खुर्ची वाचवू पाहताहेत ट्रम्प, हाच अंतिम पर्याय

अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिकचे उमेदवार जो बायडेन यांनी वडिलोपार्जित घरावर लिहिलेले ‘धिस हाऊस टू व्हाइट हाऊस’ हे वाक्य प्रत्यक्षात उतरत आहे. मतमोजणी सुरूच असून अंतिम निकाल आलेले नाहीत. बायडेन बहुमताच्या २७० आकड्याजवळ पोहोचले आहेत. ट्रम्प यांचा बालेकिल्ला असलेल्या ५१ जागांच्या पेन्सिल्व्हेनिया, उ. कॅरोलिना व जॉर्जिया या राज्यांतही आता चुरस आहे. येथे सुरुवातीस ट्रम्प यांची आघाडी २५% पर्यंत पोहोचली होती. कारण, प्रारंभिक मोजणीत इलेक्शन डे म्हणजे फक्त ३ नोव्हेंबरच्या मतांचा समावेश होता. मात्र टपाली मतांच्या मोजणीनंतर ट्रम्प यांची लीड घटत गेली. ट्रम्प यांनी घोटाळ्याचा आरोप करत कोर्टात जाण्याची घोषणा केली होती. त्यांच्या पक्षाने अनेक राज्यांत मतमाेजणी थांबवण्याची मागणी कनिष्ठ न्यायालयात केली आहे.

अंतिम निकाल कधी येईल?
केस कोर्टात अडकली नाही तर १२ तारखेपर्यंत येईलच
निकाल कुठे अडकला आहे आणि का?
प्रकरण मतमोजणी व कायदेशीर लढाईत अडकले आहे. उर्वरित ५ राज्यांत ६, ९ व १२ नोव्हेंबरला मोजणी होईल. ट्रम्प यांना कोर्टाने दिलासा दिला नाही तर १२ तारखेला अधिकृत निकाल जाहीर होईल.

ट्रम्प यांना आताही बाजी उलटवता येईल?
हाे, जर त्यांनी पेन्सिल्व्हेनिया, जॉर्जिया व उ. कॅरोलिनासह नेवाडा जिंकले. आता ६ मते असलेला नेवाडाच त्यांची खुर्ची वाचवू शकतो. ही मते ट्रम्पकडे गेल्यास सध्या बायडेन बहुमतापेक्षा ६ मतांनी मागे राहतील. नेवाडात बायडेन फक्त ०.३% मतांनी पुढे आहेत. तथापि, अजून १४% मतांची मोजणी बाकी आहे.

न्यायालयीन लढाईचा अर्थ काय?
सध्या तरी सुप्रीम कोर्टाच्या हस्तक्षेपाची स्थिती दिसत नाही
कोर्टात ट्रम्प यांना दिलासा मिळेल का?
ओहियो स्टेट युनिव्हर्सिटीचे निवडणूक कायद्याचे तज्ज्ञ नेड फॉले म्हणाले, निकाल स्पष्ट झाल्यानंतर कोर्टासाठी आकड्यांकडे दुर्लक्ष करणे कठीण होईल.

बायडेन यांना विजेते मानू शकतो का?
अधिकृतरीत्या नाही, पण वास्तवात ते जिंकले आहेत. टेक्सास युनिव्हर्सिटीच्या ऑस्टिन स्कूल ऑफ लॉचे प्रा. स्टीव्ह व्लाडेक म्हणाले की, ट्रम्प थेट सुप्रीम कोर्टात गेले तर त्यांचे अपील रद्द होण्याची जास्त शक्यता आहे. अपील स्वीकारले तरी अंतिम निकालावर परिणाम होणार नाही. विशेषत: बायडेन हे २७० च्या आकड्यापर्यंत पोहोचलेले असताना.

ट्रम्प यांचे भविष्य काय असेल?
ट्रम्प राजकारण व प्रशासन दोन्हींत प्रभावशाली राहतील
आता पक्षात ट्रम्प यांची स्थिती काय असेल?
ट्रम्प यांना ९३% रिपब्लिकन्सचे समर्थन आहे. त्यांना २०१६ च्या तुलनेत या वेळी ५० लाख पॉप्युलर व्होट जास्त मिळाली आहेत. दुसरीकडे सोशल मीडियावर त्यांचे ८.८० कोटी फॉलोअर्स आहेत.त्यांच्याजवळ आपल्या समर्थकांचा कधी नव्हे एवढा डेटाबेस आहे.

सरकारमध्येही त्यांचा प्रभाव असेल का?
होय. कारण अमेरिकी संसदेत ‘सिनेट’ हे वरिष्ठ सभागृह सर्वात शक्तिशाली आहे. तेथे ट्रम्प व बायडेन यांच्या पक्षाला प्रत्येकी ४८ जागा आहेत. त्यामुळे ते तेथेही सरकारची लोकप्रिय धोरणे, विधेयके अडवण्याचा प्रयत्न करू शकतात.